सहा हजार एकरवरील द्राक्षांना फटका

जालना दि.०७ :- मागील पाच वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. कडवंची येथील शेतकऱ्यांनी २०१२ मध्ये १२ कोटी रुपयांचे उत्पन्न घेतले होते. २०१३ मध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे यामध्ये ५० टक्क्यांनी घट झाली होती. मागील वर्षीही गारपिटीचा मोठा फटका बसला होता. या वर्षीही ३० ते ४० कोटींचे उत्पन्न उत्पादकांना अपेक्षित होते. मात्र, परतीच्या पावसामुळे उत्पन्नात मोठी घट होणार आहे. १,७०,००० पर्यंतचा एकरी खर्च ६००० एकर जिल्ह्यात एकूण क्षेत्र ६० टक्क्यांवर झाले नुकसान १०० कोटीं रुपयांची होते उलाढाल ४० घड येतात एका वेलाला जिल्ह्यात सध्या सहा हजार एकरवर द्राक्ष बागा आहेत. एप्रिलपासून शेतकऱ्यांनी त्याचे नियाेजन केले होते. छाटणीपासून ते घडनिर्मिती ऑक्टोबरला गोळी छाटणीची वेळ होती.

हेही वाचा :- दुसऱ्यादिवशीही महापालिकेची धडक कारवाई फुटपाथवरील बांधकामे जमीनदोस्त

मात्र, सतत दहा ते बारा दिवसांच्या परतीच्या पावसाने द्राक्ष उत्पादकांना चांगलाच फटका दिला आहे. एकूण द्राक्ष उत्पादनाला सध्या ६० टक्के फटका बसला आहे. राज्यातील द्राक्ष उत्पादनाचे भांडार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरापासून १२ किलोमीटरवरील कडवंचीत पाण्याचा ताळेबंद बांधून ऐन दुष्काळातही शेतकऱ्यांनी शेकडो एकर जमीन ओलिताखाली आणली आहे. या परिसरात जवळपास ९०० एकर क्षेत्रावर द्राक्षांची लागवड केली आहे. २०१२ मध्ये साडेतीनशे, २०१३ मध्ये अडीचशे एकर आणि त्यानंतर २०१९ मध्ये ६ हजार एकरावर द्राक्ष उत्पादन केले जाते.

हेई वाचा :- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कल्याण शहर दिवाळी शिबिर

बागांची छाटणी झाल्यानंतर पुढील दीडशे दिवस शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागते. यंदा मात्र, छाटणीनंतर घड निर्मितीची प्रक्रिया सुरू असतानाच त्यावर परतीच्या पावसाचे पाणी फेरले गेले. ज्या बागेत ४० घड निर्मिती अपेक्षित अाहे तेथे केवळ १५ ते १७ घडांची निर्मिती होणार असल्याचे मत तज्ज्ञ शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. पुढील काही दिवस असेच वातावरण राहिल्यास हाती येणाऱ्या ४० टक्के उत्पन्नातही घट होण्याची शक्यता आहे. ज्यांनी उशिराने छाटणी करण्याचे नियोजन केले त्यांना पुढील उत्पादनाची संधी असल्याचे जिल्हा कृषि अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले.

Hits: 0

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email