हिंदूंनो, जिवंत रहायचे असेल, तर लढायला शिका, आत्मरक्षण करायला शिका !

नागराजूची हत्या : सेक्युलर गँग गप्प का ?’ या विषयावर विशेष संवाद !

हिंदूंनो, जिवंत रहायचे असेल, तर लढायला शिका, आत्मरक्षण करायला शिका ! – टी. राजासिंह, भाजप आमदार, तेलंगणा

भारत हे ‘सेक्युलर’ राष्ट्र असल्यामुळेच भाग्यनगर (हैदराबाद) येथील नागराजू या हिंदु युवकाची दिवसाढवळ्या हत्या झाली. जोपर्यंत भारत अखंड ‘हिंदु राष्ट्र’ होत नाही, तोपर्यंत हिंदू अशाच प्रकारे मारले जातील. नागराजूची हत्या करणारे मुसलमान असल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही; उलट तेलंगणा सरकार आणि एम्आयएम् पक्ष त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतील.

ज्या वेळी नागराजूला मारले जात होते, तेव्हा तेथे उपस्थित असलेले 90 प्रतिशत हिंदू शांत होते. हिंदु लढू इच्छित नाहीत, तर मरणासाठी तयार आहेत. हिंदु आज ‘सेक्युलर’ झाले असून तो ‘हिंदु-मुसलमान भाईभाई’ची विचारधारा घेऊन जगत आहेत.

अशा ‘सेक्युलर’ हिंदूंनी लक्षात घ्यावे की, उद्या हे धर्मांध तुमच्या बहिणीला, मुलीला आणि आईला घरातून उचलून नेतील. त्यामुळे हिंदूंनो, जिवंत रहायचे असेल, तर लढायला शिका, आत्मरक्षण करायला शिका.

अन्यथा येणार्‍या काळात तुम्हाला कपाळावर टिळा लावण्यासाठी विचार करावा लागेल, *असे रोखठोक प्रतिपादन तेलंगणा येथील गोशामहल येथील भाजपचे आमदार श्री. टी. राजासिंह यांनी केले आहे.* हिंदु जनजागृती समितीच्या वतीने *’नागराजूची हत्या : सेक्युलर गँग गप्प का ?’* या विषयावर आयोजित ऑनलाईन ‘विशेष संवादा’त ते बोलत होते.

या वेळी बोलतांना *’द लीगल हिंदु’चे राष्ट्रीय सहसंस्थापक श्री. समीर चाकू म्हणाले की,* निघृणपणे हत्या झालेला नागराजू हा हिंदू असल्यामुळे काँग्रेसचे राहुल गांधी, ‘आप’चे अरविंद केजरीवाल, वामपंथी, सेक्युलर पक्ष तेथे भेट द्यायला जाणार नाहीत; कारण ते धर्म-जाती आधारित राजकारण करतात. प्रसिद्धीमाध्यमेही त्याला विशेष प्रसिद्धी देणार नाहीत. त्यामुळे हिंदूंनी स्वत:च्या रक्षणासाठी लढायला शिकायला हवे.

या वेळी *बजरंग दलाचे मुंबईचे माजी संयोजक श्री. उमेश गायकवाड म्हणाले की,* केवळ नागराजूचीच नव्हे, या आधी देशभरात झालेल्या अनेक हिंदूंच्या हत्यांमागे मोठे षड्यंत्र आहे. आता तर आतंकवादी, खलिस्तानी आणि नक्षलवादी एकत्र आले आहेत.

मुंबईतील एका चौकशीत वर्ष 2024 मध्ये देशात मोठी दंगल घडवण्याचे षड्यंत्र चालू असल्याचे समोर आले आहे. एक मोठा संघर्ष होणार आहे. त्यामुळे हिंदूंनी व्यवस्थेसोबत राहून लढायला पाहिजे.

या वेळी *हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. नरेंद्र सुर्वे म्हणाले की,* भारतात हिंदूंच्या हत्या करून हिंदूंनाच बदनाम करण्याचे जागतिक षड्यंत्र चालू आहे. हिंदूंच्या हत्या करणार्‍या मुसलमानांना सोडवण्यासाठी ‘जमियत-ए-उलेमा’ आर्थिक साहाय्य करत आहे.

केरळ आणि कर्नाटक राज्यांत ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ने अनेक हिंदूंच्या हत्या केल्याने या संघटनेवर केंद्राने बंदी आणली पाहिजे. हिंदूंनी आता स्वरंक्षणासाठी जागृत झाले पाहिजे. निद्रिस्त हिंदूंना विविध प्रकारच्या जिहादची माहिती, तसेच स्वधर्माचे शिक्षण देऊन जागृत केले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published.