आरोग्य मंत्रालयाने सुरु केला बजेट डॅशबोर्ड

नवी दिल्ली, दि.२० – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने बजेट, खर्च आणि देयक भरणा स्थितीबाबत एक नवीन बजेट डॅशबोर्ड सुरु केला आहे. यामध्ये आयुष मंत्रालय आणि आरोग्य संशोधन विभाग यांचाही समावेश आहे. या डॅशबोर्डमध्ये सर्व महत्वपूर्ण योजनांची सविस्तर माहिती उपलब्ध आहे.

या डॅशबोर्डमध्ये मागणीनुसार माहिती पुरवण्याची एसएमएस सुविधा आहे. विजया श्रीवास्तव आणि भारती दास यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य मंत्रालयाच्या चमूने व्यय विभागाचे सचिव ए.एन.झा यांच्या समोर डिजिटल बजेट डॅशबोर्डबाबत आज सादरीकरण केले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email