जागतिक क्षयरोग प्रतिबंध दिनानिमित्त आरोग्य मंत्रालयाकडून कार्यक्रमाचे आयोजन

नवी दिल्ली, दि.२५ –  जागतिक क्षयरोग प्रतिबंध दिनानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आरोग्य सचिव प्रीती सुदान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. वर्ष 2025 पर्यंत टीबी अर्थात क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्याविषयीच्या कटिबद्धता कार्यक्रमात पुन्हा व्यक्त केली. बळकट आरोग्य व्यवस्थेमुळे विशेषत: प्राथमिक आरोग्यनिगा स्तरावरील सक्षमीकरणामुळे पोलिओ, यॉज, एमएनटीई यांचे उच्चाटन भारत करु शकला, असे सांगून क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी आरोग्य यंत्रणा रुग्ण केंद्री असण्याची आवश्यकता सुदान यांनी व्यक्त केली.

हेही वाचा :- नीति आयोगाकडून फिनटेक 2019 परिषदेचे आयोग

टीबी रुग्णांच्या आहारासाठीची निक्षय पोषण योजना थेट लाभ हस्तांतरणाशी जोडल्याचा लाभ 15 लाख रुग्णांना झाला. एप्रिल 2018 पासून 240 कोटी रुपये यातून वितरित करण्यात आले. देशभरामध्ये 1,180 सीबीएनएएटी प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आल्या असून, ग्रामीण स्तरावर 4 लाख उपचार सहायता केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. विविध प्रयत्नांमुळे उपचार सफलता दर (2017-18) मध्ये 25 टक्क्यांवरुन 83 टक्क्यांवर पोहोचला आहे आणि क्षयरोग प्राबल्याचा दर 29 टक्क्यांवरुन 4 टक्क्यांवर आला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email