पत्नीवर चाकूने हल्ला जाब विचारण्यास गेलेल्या पतीवरही वार
डोंबिवली दि.०६ :- कल्याण पश्चिम चौधरी मोहल्ला खुर्शीद अपार्टमेंटमध्ये राहणारे मोईन मिरसिंगे यांच्या पत्नीचे याच इमारती मध्ये राहणाऱ्या शफी खान यांच्याशी भांडण झाले संतापलेल्या शफी ने मोईन यांच्या पत्नीवर चाकूने हल्ला केला.
हेही वाचा :- kalyan ; सुराधारी तरुणावर झडप
याबाबत मोईन यांनी जाब विचारला असता शफी ने मोईन याच्यावर देखील चाकूने हल्ला करत तेथून पळ काढला. या हल्ल्यात मोईनसह त्यांच्या पत्नीला दुखापत झाल्याने त्याना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मोईन यांनी दिलेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी शफी खान विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
Please follow and like us: