नांदवली स्वामी समर्थ मठाजवळ दोन  मजली अनधिकृत इमारतीवर हातोडा

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.०९ – कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ‘इ ‘प्रभागातील स्वामी समर्थ मठाजवळ असलेल्या अनधिकृत बालाजी संकुलाच्या दोन इमारतीवर पालिकेने हातोडा मारला. मात्र तळ अधिक दोन मजले रिकामे असल्याने त्यावर कारवाई करण्यात आली. यामुळे वरच्या मजल्यावर रहाणारे रहिवासी घाबरून खाली आले. आज दुपारी पूर्व सूचना न देता 2 पोकलन्ड मशीन ,3 जेसीबी ,प्रभाग अधिकारी व पोलीस असा प्रचंड फौजफाटा घेऊन प्रभाग अधिकारी रवींद्र गायकवाड बालाजी इमारतीजवळ आले. एक व दोन आशा या इमारतीत सुमारे 100 कुटुंबे रहात असून आयत्या वेळेस तिसरी नोटीस देऊन व ती दारावर लावण्यात आल्याची तक्रार महिला करत होत्या घर घेताना सर्व कागदपत्र दाखवली म्हणून आम्ही घर घेतले. आता मात्र बिल्डर लपून बसल्याची तक्रार महिला करत होत्या.

हेही वाचा :- कल्याण-डोंबिवलीकरांनो पाण्याचा टॅकर हवे असल्यास मोजावे लागणार पैसे …

पालिकेने सात मजली इमारतीतील गाळे व दोन मजले रिकामे आहेत. ते तोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली. यामुळे रहिवासी रहात होते तो भाग जेसीबी व पोकलंडच्या दणक्याने हादरून गेला व घबराट निर्माण झाली. पालिकेची कारवाई अन्यायाची असून बिल्डरने आमची फसवणूक केली. आता आम्ही जायचं कुठे असा आक्रोश रहिवासी करत होते. या सदर्भारत प्रभाग अधिकारी रवींद्र गायकवाड यांना विचारले असता सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कारवाई करत असल्याचे सांगितले 4 प्रभाग अधिकारी ,2 पोकलन्ड ,3 जेसीबी मशीन ,पोलीस व इतर कर्मचारी असा मोठा फौजफाटा या कारवाईत सहभागी झाला होता. डी पी रस्त्याच्या मध्ये या इमारती म्हात्रे या बांधकाम व्यावसायिकाने बांधल्याचे त्यांनी सांगितले. खास सूत्रांच्या माहितीनुसार पालिकेतील एक निलंबित अधिकारी व एक वरिष्ठ अधिकारी यांच्या संघर्षात नागरिकांचा बळी घेण्यात आल्याचे समजते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email