कल्याणमध्ये मिळालेल्या अर्ध्या मृतदेहाला फुटली वाचा ऑनर किलिंगचा प्रकार उघड

कल्याण दि.१० :- कल्याण स्टेशन परिसरात आढळून आलेल्या अर्ध मृतदेहाचे रहस्य उलगडले आहे. यात प्रेमप्रकराणातून बापाने मुलीची हत्त्या केल्याचे उघड झाले आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग व महात्मा फुले चौक पोलिसांनी केलेल्या तपासात या गुन्ह्यातील आरोपी बापाला शोध घेऊन तीस तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपी पित्याचे नाव अरविंद रमेशचंद्र तिवारी (47) आहे. तर हत्या केलेल्या त्याच्या मुलीचे नाव प्रिन्सि तिवारी असे आहे. टिटवाळ्यातील राहणाऱ्या अरविंद तिवारीची मुलगी प्रिन्सिचे एका परजातीय मुलाबरोबर प्रेम संबंध होते. या गोष्टीचा राग अरविंद याच्या मनात खदखदत होता. त्यामुळे मुलीची अत्यंत क्रूरपणे हत्या अरविंद तिवारी यानेच केल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले आहे.

हेही वाचा :- क्लस्टर पात्र इमारतींवर रस्तारुंदीकरणाची कारवाई नको प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिवावासीय उभारणार मानवी साखळी

कल्याण स्टेशन पश्चिमेतील व्होडाफोन गॅलरी समोर गजबजलेल्या स्टेशन परिसरात रस्त्यालगत रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास बॅगमध्ये ठेवलेल्या प्लास्टिक पिशवीत अनोळखी तरुणीचे कमरे खालचे धड आढळून आल्याने एकच खळबळ मजली होती. या प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून सदर धड रूक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये उत्तरीय तपासणीकरिता पाठविले. कल्याण स्टेशन परिसरात हातात भली मोठी बॅग घेऊन चढला. या बॅग मधून वास आल्याने रिक्षावाल्याने त्याला हटकले असता सदर इसम बॅग खाली ठेवून स्टेशनच्या बाजूला पळून गेला. त्यानंतर रिक्षावाल्यांनी एसटी स्टँड चौकीला बीट मार्शल यांना माहिती दिली. बॅगची तपासणी केली असता सदर बॅगमध्ये एक स्त्री जातीचा अर्धा म्हणजेच कमरेपासून खालचा भाग आढळून आला होता. सदर अनोळखी महिलेचे वय अंदाजे वीस ते पंचवीस वर्षे रंग-गोरा पायामध्ये पिवळी लेगिंग घातलेली होती.

हेही वाचा :- राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करा – मुख्यमंत्री.

देशात तरुणींवर वाढलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर महात्मा फुले चौक पोलीसांनी तपासास सुरूवात केली. त्याच बरोबरच ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग देखील समांतर तपास करीत होता. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी टिटवाळ्यातून ट्रेनमध्ये चढल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे पोलीस तपास टिटवाळा परिसरात सुरू करण्यात आल्यावर सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेला आरोपीला शोधून काढले असता तो मृत मुलीचा पिता असल्याचे निपन्न झाले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email