हलाल सर्टिफिकेशन : एक आर्थिक जिहाद’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !
*जगावर इस्लामची सत्ता आणण्यासाठीच ‘हलाल’ अर्थव्यवस्थेची रचना !* – श्री. रवी रंजन सिंह, अध्यक्ष, झटका सर्टिफिकेशन अथॉरिटी
‘हलाल सर्टिफिकेशन’ (प्रमाणिकरण) द्वारे जगाची अर्थव्यवस्था नियंत्रणात आणली जात आहे. गेल्या 50 वर्षांत 10 ट्रिलियन अमेरिकी डॉलरची अर्थव्यवस्था इस्लामी देशांनी उभी केली आहे.
ती भारताच्या अर्थव्यवस्थेच्या तिप्पट आहे. हलालचा पैसा इस्लामी वर्चस्व निर्माण करणे आणि आतंकवाद यांसाठी वापरला जात आहे, अशी जगभरातील अनेक गुप्तचर संस्थांची माहिती आहे. हलाल हे ‘मदर ऑफ जिहाद’ आहे.
‘ग्रँट मुक्ती ऑफ बोसनिया’चे मौलाना मुस्तफा हे आय.एस्.आय.एस्. आणि तालिबानी आतंकवाद्यांना म्हणाले होते की, ‘तुम्ही स्वतःच्या मुसलमान बांधवांचे रक्त का वहावत आहात, हलाल अर्थव्यवस्थेच्या माध्यमांतून आपण जगावर इस्लामची सत्ता आणू शकतो. एकदा का ते (मुसलमातेर देश) आपले गुलाम झाले की, यांचे सर्व धन लुटून घेऊ.’
अनेक देशांत पंचतारांकित हॉटेलांमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदा भरवून त्या देशातील राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना बोलावून ‘तुम्ही हलाल सर्टिफिकेट घेतल्यास एक चतुर्थांश जग तुमची उत्पादने घेईल’, असे सांगून त्यांना ‘हलाल सर्टिफिकेट’ घेण्यास बाध्य केले जात आहे.
Inयातून जगावर इस्लामची सत्ता आणणे, यासाठीच ‘हलाल अर्थव्यवस्थे’ची रचना करण्यात आली आहे, *असे प्रतिपादन ‘झटका सर्टिफिकेशन अथॉरिटी’चे अध्यक्ष श्री. रवी रंजन सिंग यांनी केले.* हिंदु जनजागृती समिती आयोजित *’हलाल सर्टिफिकेशन : एक आर्थिक जिहाद’* या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.
*हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे म्हणाले की,* हलाल हे केवळ मांसच नव्हे, तर अनेक खाद्यपदार्थांसह सौंदर्यप्रसाधने, बांधकाम व्यवसायातही लागू झाले आहे. ‘हल्दीराम’ची 500 उत्पादने, ‘आशीर्वाद’ आटा, ‘अमूल’चे आईस्क्रीम, ‘फॉर्च्युन’ ऑईल, यांसह अनेक आयुर्वेदिक औषधे ही ‘हलाल सर्टिफाइड’ आहेत. भारताच्या अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) ‘खाद्य सुरक्षा आणि मानकीकरण प्राधिकरण’ (FSSIA) हे अधिकृत शासकीय प्रमाणपत्र असतांना हे ‘हलाल सर्टिफिकेट’ कशासाठी ? आम्ही वर्षभर आंदोलने करून 24 हजार कोटी रुपयांचे मांस निर्यात करणार्या भारत सरकारच्या ‘अपेडा’च्या नियमातून ‘हलाल प्रमाणित मांस’ हा शब्द काढण्यात यशस्वी झालो आहोत. तसेच 40 हजार कोटी रुपयांची अर्थव्यवस्था असणार्या भारत सरकारच्या ‘एअर इंडिया’, रेल्वेची ‘आय.आर्.सी.टी.सी.’, भारतीय पर्यटन मंडळाचे ‘आय.टी.डी.सी.’ यांमधून ‘हलाल प्रमाणित’ उत्पादने हटवण्यासाठी लढा द्यायचा आहे. ‘हलाल उत्पादने’ घेऊन आपल्याला इस्लामी अर्थव्यवस्थेला चालना द्यायची नाही, तर हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देऊन ‘हलाल अर्थव्यवस्था’ बंद करायची आहे, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.
*या वेळी ‘विवेकानंद कार्य समिती’चे अध्यक्ष श्री. नीरज अत्री म्हणाले की,* हलाल आणि हराम ही इस्लामनुसार काय योग्य आणि काय अयोग्य हे सांगते. या माध्यमातून लोकांना नियंत्रित करणारी ही व्यवस्था असून याद्वारे इस्लामचे वर्चस्व निर्माण केले जात आहे.
Hits: 1