सरकारने विज्ञान संचार क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील दोन उपक्रमांना केल्या शुभारंभ

नवी दिल्ली, दि.१६ – विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने दूरदर्शन, प्रसारभारतीच्या सहकार्याने डीडी सायन्स आणि इंडिया सायन्स हे दोन विज्ञान उपक्रम सुरू केले. डीडी सायन्स हा दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर एक तासाचा कार्यक्रम असेल आणि सोमवार ते शनिवार संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत प्रसारित होईल. इंडिया सायन्स ही इंटरनेट आधारित वाहिनी आहे.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी या दोन प्रमुख उपक्रमांचे उद्‌घाटन केले. विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी दूरदर्शन हे सर्वात प्रभावी माध्यम असल्याचे ते म्हणाले. नजीकच्या काळात देशातल्या जनतेला चोवीस तास डीडी विज्ञान वाहिनी पाहता येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या दोन्ही वाहिन्यांवर विज्ञानावर आधारित लघुपट, चर्चा, विज्ञान संस्थांना भेटी, मुलाखती सादर केल्या जातील.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email