राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाचे उद्घाटन
नवी दिल्ली, दि.१० – वायू प्रदूषण हे जागतिक पर्यावरणदृष्ट्या एक मोठे आव्हान आहे. देशातल्या वाढत्या वायू प्रदुषणाची समस्या हाताळण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर समावेशक कालबद्ध धोरण राबविण्यासाठी एनसीएपी अर्थात राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाचे केंद्रीय पर्यावरणमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज नवी दिल्लीत उद्घाटन केले.
हेही वाचा :- केंद्रीय गृहमंत्र्यांकडून नागरिकत्व सुधारणा विधेयक 2019, लोकसभेत सादर
वायू प्रदूषण रोखणे, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी समावेशक कृती आणि देशातल्या हवा गुणवत्ता सुधार नेटवर्कमध्ये वृद्धी करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट असल्याचे हर्ष वर्धन म्हणाले.
Please follow and like us: