Dombivali ; बनावट दागिने गहाण ठेवत सोनाराला सहा लाख ७० हजारांना गंडा

डोंबिवली दि.१५ :- गरज असल्याचे सांगत बनावट दागिने खरे असल्याचे भासवून गहाण ठेवत एका सोनाराला तब्बल सहा लाख 70 हजारांचा गंडा करण्यात आल्याची घटना डोंबिवलीत उजेडात आली आहे या प्रकरणी संबंधित सोनार यांनी विष्णू नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. डोंबिवली फडके रोड कृष्णा सरस्वती सोसायटीमध्ये फसवणूक झालेला ज्वेलर राहतो. डोंबिवली पश्चिम गुप्ते रोड वैशाली बिल्डिंग येथे राहणाऱ्या कोमल शहा व प्रज्योत शिंदे या दोघांशी या ज्वेलर्स ची ओळख आहे.

हेही वाचा :- ५० लाखांच्या खंडणी प्रकरणी छोटा राजनच्या पुतणीसह दोन साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल

दोन जानेवारी रोजी कोमल यांनी आपल्याला पैशाची गरज असल्याचे सांगत त्यांच्याजवळील सोन्याचा मुलामा लावलेले बनावट सोन्याचे दागिने खरे असल्याचे भासवून सदर सोनाराला गहाण aठेवण्यास दिले यावेळी सोनाराने त्यांना सहा लाख 70 हजार रुपये देऊ केले काहीवेळाने हे दागिने बनावट असल्याचे या सोनाराच्या लक्षात आले याप्रकरणी त्यांनी विष्णुनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी कोमल शहा व प्रज्योत शिंदे विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email