खड्ड्यामुळे तरुणीचा बळी, लग्नाच्या खरेदीवरुन येताना अपघात
भिवंडी दि.१० :- तील दुगाडफाटा येथे २३ वर्षीय तरुणाचा खड्ड्याने बळी घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेनंतर रस्त्यावरील खड्डे आणखी किती बळी घेणार आहेत, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. मनोर वाडा भिवंडी या ६४ किलोमीटरच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर आत्तापर्यंत शेकडो बळी गेले आहेत.
हेही वाचा :- रिलायन्स जिओ 10 ऑक्टोबरपासून इतर ऑपरेटरला कॉल करण्यासाठी 6 पैसे/ मिनिट शुल्क आकारण्यास सुरूवात करेल
मागील अनेक वर्षांपासून येथील स्थानिक रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात लढा देत आहेत. महामार्गावर लहान-मोठ्या अपघातांची मालिका सुरूच असून या महामार्गावर खड्ड्यांमुळे गेलेला महिनाभरातील हा तिसरा बळी आहे. नेहा आलमगीर शेख असे या तरुणीचं नाव आहे.
हेही वाचा :- मुंबईतील धारावी भागात निवडणूक आयोगाने पकडले 8 लाख 17 हजार
नेहाच्या मृत्यूने संतप्त झालेल्या नागरिकांनी वाडा – भिवंडी महामार्गावरील टोल नाका ही बंद केला आहे. ज्या ट्रकखाली नेहाचा अपघात झाला त्या ट्रकचा चालक पळून गेला आहे. नेहा वाडा तालुक्यातील कुडुस येथे राहणारी होती. पुढील महिन्यात ७ नोव्हेंबरला तीच लग्न होणार होतं.