जायंट किलर सरपंच निशांत घरत यांचा भाजपला रामराम ?

उरण दि.१३ – उरण तालुक्यातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या नविन शेवा या गावातील ग्रामपंचायतीवर थेट अपक्ष सरपंच निवडून येऊन ज्यांची गणना “जायंट किलर” म्हणून केली गेली असे तरुणांचे लाडके सरपंच निशांत घरत हे भाजपा ला रामराम करण्याच्या मार्गावर आहेत. अशी चर्चा उरणच्या राजकारणात सध्या जोरदार सुरु आहे. मागिल सन २०१७ च्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीत निशांत घरत आणि सहकारी यांनी ९ सिटचा पूर्ण अपक्ष पँनल उभा केला होता. जनसेवेशी तत्पर असलेल्या निशांत घरत यांच्या अपक्ष पँनल ला गावातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद देउन त्यामधून तब्बल ६ सदस्य आणि स्वतः निशांत घरत हे मोठ्या फरकाने थेट सरपंच पदावर विराजमान झाले. निशांत घरत सरपंच पदभार सांभाळत असतांनाच भाजपाच्या नेतृत्वाखाली पनवेल येथिल नाट्यगृहात भाजप प्रवेश केला. निशांत घरतांच्या भाजपा प्रवेशांने भाजपा कडून १/२ कोटी रुपये घेउन पक्ष प्रवेश केला.

हेही वाचा :- उरणमधील बिल्डरांचे धाबे दणानले बिल्डरांच्या अरेरावीला बसणार चाप.

अशी तालुक्यातुन राजकिय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधान आले होते. परंतु हा पक्ष प्रवेश मी गावातील समस्या मार्गी लागाव्यात यासाठी मी विकासाचा राजमार्ग निवडला आहे असे सुतोवाच दस्तरखुद्द सरपंच निशांत घरतांनी केला होते. भाजपा प्रवेश करत असतांना शेवे गावच्या ३० वर्ष गावठाणाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन तालुक्यातील भाजपच्या नेते मंडळीने दिले होते. परंतु आश्वासनाला एक वर्ष पुर्ण झाले तरी अजून साधी एक बैठकही बोलाविली नाही. शिवाय भाजपवासी झाल्यानंतर पक्षीय पक्षीय दबाव निशांत घरत यांच्यावर येत. प्रत्येकवेळी बदनामी सहन करावी लागली. यामुळे राजकीय नेते मंडळींच्या आश्वासनांच्या भुलथापाना बळी पडण्यापेक्षा आपण आपल्या लढ्यांनीशी लढून जनतेची कामे करु असे मत सरपंच निशांत घरत यांचे आहे अशी चर्चा सध्या सुरु आहे. त्यामुळे सरपंच निशांत घरत यांनी घेतलेला निर्णय लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर उरण तालुक्यात मोठा राजकिय बदलाच्या दृष्टीने कसा ठरतोय ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email