Dombivali ; सुशिक्षितांच्या सांस्कृतिक नगरीत भुताटकीचा फेरा

ईडापिडा व भुताटकी दूर करण्याच्या उद्देशाने अंधश्रद्धेपोटी डोंबिवलीच्या एका चौकात वर्दळीच्या रस्त्यावर अज्ञाताने ठेलेल्या करणी-प्रेतबाधेच्या उताऱ्यामुळे आसपाच्या रहिवासी, पादचाऱ्यांसह वाहनचालकांचा भीतीने थरकाप उडताना दिसून येत आहे. भुताटकीने झपाटलेल्याची ईडापिडा दूर करण्यासाठी उतरवून काढलेला हा उतारा सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे. टिटवाळ्याच्या वैष्णोदेवी माताजी मंदिरातील पुजारी लालदीप सिंग उर्फ मंजू माता या भामट्यावर जादूटोणा, नरबळी, अंधश्रद्धा, अनिष्ट, अघोरी प्रथा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना ताजी असतानाच डोंबिवलीसारख्या सुसंस्कृत आणि सुशिक्षितांच्या नगरीत भुताटकीचा फेरा आल्याचे उताऱ्याच्या प्रकारावरून उघडकीस आले आहे. जिल्ह्यातील बहुंताश ग्रामीण परिसरातील गाव-पाड्यातील वस्तीत आजही अंधश्रद्धा ठासून भरल्याचे दिसून आले आहे. असाच एक अंधश्रद्धेचा तोडगा डोंबिवलीसारख्या सुसंस्कृत आणि सुशिक्षितांच्या नगरीत आढळून आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. सावित्रीबाई फुले नाट्यगृहाजवळच्या बंदिश पॅलेस चौकात उतारा रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आल्याचे रविवारी सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांना आढळून आले.

हेही वाचा :- डोंबिवलीकरांना मिळणार घरोघरी पाईपलाईनद्वारे गॅस

ज्या ठिकाणी उतारा ठेवण्यात आला त्याठिकाणी आसपाच्या परिसरात बंद पडलेल्या कंपन्या, काही अंतरावर सावित्रीबाई फुले कला मंदिर, हॉटेल्स, निवासी वस्त्या आहेत. उताऱ्याच्या समोर असलेल्या एका वास्तूला तर भूत बंगल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. समोरून कल्याणला जोडणारा रस्ता, एमआयडीसी आणि निवासी विभागातील रस्ता असे चौफेर रस्ते मिळत असल्याने या रस्त्यावरील पादचारी अथवा वाहनचालक प्रवास करीत असताना समोरच भुताटकीचा करणी उतारा लक्ष वेधून घेत आहे. मात्र रस्ता ओलांडताना पादचारी अथवा वाहन चालक या उताऱ्यावरून गेल्यास भुताटकी आपल्या मागे लागण्याची भीती व्यक्त करतात. सर्वच जण भूत झपाटेल या भीतीने आपआपली काळजी घेऊनच या भागात वावरत आहेत. एकीकडे भुताटकीच्या या करणी उताऱ्याला घाबरून सर्वांनाच त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे स्थानिक प्रशासनाने या रस्त्यावरील भुताटकीच्या करणीचे साहित्य दूर करावे, अशी मागणी परिसरातील रहिवासी, मॉर्निंग वॉकर, पादचारी, वाहनचालक व प्रवाशांकडून केली जात आहे.

हेही वाचा :- कोपरी पुलाचा पहिला टप्पा पाच महिन्यांत पूर्ण करा एकनाथ शिंदे यांचे आदेश

डोंबिवलीसारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत शहरात अंधश्रद्धा फोफावते आहे. आजही काळी जादू, भानामतीचे प्रकार केले जातात याचे मला आश्चर्य वाटते आहे. सावित्रीबाई फुले नाट्यगृहजवळच्या बंदिश पॅलेस समोर चौकात दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या बाजूला काय पडले आहे म्हणून पाहिले असता हा प्रकार दिसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कल्याण-डोंबिवली जिल्हा सचिव प्रसन्न अचलकर यांनी सांगितले.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email