बहिऱ्या निवडणूक आयोगाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे घंटानाद आंदोलन

( बालकृष्ण मोरे )

कल्याण / बहिऱ्या निवडणूक आयोगाचे कान उघडावे म्हणून “ईव्हीएम हटाओ, देश बचाओ असा नारा देत वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघाच्या वतीने कल्याण मध्ये सोमवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले. ईव्हीमला भारी विरोध होत असताना मात्र निवडणूक आयोग ईव्हीएम द्वारेच निवडणुका घेत आहे.या बहिऱ्या निवडणूक आयोगाला जाग आणण्या साठी वंचित बहुजन आघाडीने हे घंटानाद आंदोलन केले.

भारत हा जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश आहे. भारतीय लोकशाही सर्वश्रेष्ठ संविधानामुळे समृध्द आहे. जगातील अनेक लोकशाही देशांनी ईव्हीएम मशिन नाकारली आहे. मात्र भारतातील तमाम वंचित बहुजन समाजाचे प्रतिनिधीत्व नाकारणाऱ्या प्रस्थापित सरकारने ईव्हीएम मशीनचा स्विकार केला आहे. येणाऱ्या विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात म्हणजे खऱ्या लोकप्रतिनिधींना संधी मिळेल, अशी आमची मागणी असल्याचे भारिप पक्षाकडून करण्यात आली. कल्याण पश्चिम मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून या आंदोलनाला सुरवात झाली. महात्मा फुले चौक, मोहम्मद आली चौक, बाजारपेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून तहसीलदार कार्यालयावर या आंदोलकांनी धडक दिली. यावेळी तहसीलदारांना आगामी निवडणुकीत ईव्हीएम मशीन न वापरता बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करण्यात आली.

वंचित बहुजन आघाडीच्या या घंटानाद आंदोलना मुळे वंचीत आघाडी ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली असल्याचे बोलले जात आहे.लोकसभा निवडणूक चांगले मताधिक्य मिळवूनही वंचित आघाडी लोकसभेत पोहचू शकली नव्हती आता ही वंचित आघाडी विधानसभा निवडणूकीत कितपत यश मिळवेळ हे येणारा निवडणुकीत दिसून येईल.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email