राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करा – मुख्यमंत्री.
Hits: 0
मुंबई दि.१० :- राज्यातील रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजेत. तसेच नवीन रस्त्यांच्या कामालाही गती देताना पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा’, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली.
हेही वाचा :- निर्भया फंडाच्या त्वरित विनियोगासाठी कार्यपद्धती तयार करा: मुख्यमंत्री
सार्वजनिक बांधकाम विभागातील मनुष्यबळ विभागामार्फत सुरू असलेल्या राज्य आणि प्रमुख जिल्हा मार्गांची कामे, मुंबई-पुणे महामार्गावरील नवीन टनेल मार्ग, हायब्रीड ॲन्युइटी योजना, शासकीय इमारती, मंत्रालयाचे आधुनिकीकरण, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, वांद्रे वर्सोवा सी लिंक, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, हरित इमारत प्रकल्प आदी विविध प्रकल्पांचा आढावा यावेळी घेण्यात आला.