पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सौजन्याने ठाणे रेल्वे स्थानकात मोफत स्वयंचलित रक्तदाब तपासणी सेवा सुरू

Hits: 3

( म विजय )

ठाणे दि.०८ :- रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे जिल्हा पालकमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्या सौजन्याने अत्याधुनिक पद्धतीचे स्वयंचलित रक्तदाब तपासणी यंत्र आज ठाणे रेल्वे स्थानकात सुरु असलेल्या वन रुपी क्लिनिक मध्ये करण्यात आले आहे. या रक्तदाब तपासणी साठी आपला उजवा हात दंडापर्यंत मशीन मध्ये टाकून स्टार्ट बटन दाबल्यानंतर रक्तदाब तपासणी पूर्ण झाल्यानंतर रक्तदाब नोंदणीची प्रिंट मशीन मधून बाहेर येते.

हेही वाचा :- मराठवाड्यात १ ऑक्टोबरपासून पाणीसंकट मांजरा धरणातून होणारा पाणी पुरवठा बंद

अगदी सोपे व कमी वेळेत ही रक्तदाब तपासणी यंत्र काम करते याचे उद्घाटन ठाणे जिल्हा पालकमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी खासदार राजन विचारे, वनरूपी क्लिनिकचे डॉ. राहुल घुले, ठाणे स्टेशन मास्तर मीना यादव, माजी नगरसेवक गिरीष राजे, युवसेना उपाधिकारी हेमंत पमनानी, रमाकांत पाटील, रोहित गायकवाड, उपविभाग प्रमुख अजू देहेरकर, शाखाप्रमुख संतोष गोडके. उपविभाग प्रमुख नाना राउत, शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डोंबिवलीकरांना कुणी रस्ता देता का रस्ता ?

Leave a Reply

Your email address will not be published.