चार महिन्यात डोंबिवलीत तीन खून
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.०४ – सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असलेल्या डोंबिवली शहराला पूर्वीच्या नव्वदीच्या दशकाची पिडा लागल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. गेल्या चार महिन्यात तीन खून पडले असून डोंबिवलीत कायदा सुव्यवस्था आहे का अशी विचारणा होत आहे. रविवारी जुन्या डोंबिवलीत शुल्लक कारणावरून सचिन पाटील(25) याचा खून करण्यात आला. विशेष म्हणजे त्याच ठिकाणी गेल्या महिन्यात कुंदन जोशी याचा खून झाला होता. त्यानंतर निवासी विभागात दीपक चौहान या भंगारवाल्याचा अत्यंत निर्घृणपणे खून करून त्याचा मृतदेह बेवारस स्थितीत टाकण्यात आला होता. या सर्व हत्याचा शोध अजून लागलेले नाहींत
हेही वाचा :- डोंबिवली ; एकाच फॅनला गळफास लावून दोघा मैत्रिणींची आत्महत्या
पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून पश्चिम डोंबिवलीत टोळक्याच्या हल्ल्यात एक तरुण ठार झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. या हल्ल्यात एक जण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर पोलिसांनी एक हल्लेखोर संशयीताला ताब्यात घेतले आहे. सचिन पाटील (25) असे मृत तरुणाचे नांव असून तो जुनी डोंबिवली परिसात राहतो.
हेही वाचा :- आत्महत्या करणाऱ्या आईला रोखण्याचा प्रयत्न केला आणि…
उपलब्ध माहितीनुसार सचिन पाटील आणि अमोल म्हस्के हे दोघे दुचाकीबरून स्टेशनकडे जात होते. इतक्यात शिवमंदिराजवळ दबा धरून थांबलेल्या सिद्धेश कुलकर्णी, सचिन कळसुळकर, अमित सुर्वे आणि अजित सुर्वे या चौकडीने दुचाकी अडविली. एक महिन्यापूर्वी सचिन पाटील आणि या चौकडीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. हा वाद रविवारी रात्री उफाळून आला. सचिन पाटील याला दुचाकीवरून लाथ मारून खाली पाडले आणि त्या चौकडीने त्याच्यावर सशस्त्र हल्ला चढवला तपास चक्रांना वेग देऊन सचिन कळसुळकर याला ताब्यात घेतले.