डोंबिवली एमआयडीसी मधील कारखाने सेफ्टी ऑडिट शिवाय सुरू, प्रकरण दडपण्याचा माजी मंत्र्यांचा प्रयत्न

डोंबिवली दि.२५ :- कोणताही कारखाना सेफ्टी ऑडिट शिवाय सुरू ठेवता येत नाही. मात्र डोंबिवली एमआयडीसी येथील एक कारखाना सेफ्टी ऑडिट शिवाय बिनधास्त पणे सुरू असल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकार कायद्यान्वये भाजपाच्या एका पदाधिकार्याने उघडकीस आणली. चांगले कार्य करणाऱ्या अशा कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्याऐवजी एका माजी मंत्र्याने त्यात हस्तक्षेप करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न चालविला असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा :- आमच्या आरत्याचा जर त्रास होत नसेल तर तुमच्या मशिदींवरच्या भोग्यांचा आम्हाला त्रास का…?

डोंबिवली एमआयडीसी मधील कारखान्यातून होणारे वायू आणि जल प्रदूषण हा नेहमीच वादाचा विषय आहे. त्याचबरोबर अनेक कारखान्यांना लागणाऱ्या आगीच्या घटना व स्फोट यामुळे नागरिकांच्या व कारखान्यात काम करणारी कामगारांच्या आरोग्याचा व सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न गंभीर झाला आहे .तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मागील महिन्यात एमआयडीसी मधील महाराजा डाइंग कारखान्यात काम करणाऱ्या एका कामगारांची हाताची ६ बोटे मशीन मध्ये कापली गेली. या घटनेची पोलिसांत देखील नोंद झाली नव्हती. भाजप कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्या नंतर पोलिसात तक्रार दाखल झाली या घटनेवरून एमआयडीसी मधील कारखान्यात कायदे नियम धाब्यावर बसविले जातात ,ते निदर्शनास आले.

हेही वाचा :- मोबाईल तोडल्याचा आरोप करून लुबाडले

याबाबत औद्योगिक आरोग्य आणि सुरक्षा महासंचनालय कार्यालयाकडे माहिती अधिकार कार्यालयाकडे सदर कंपनीचे सेफ्टी ऑडिट झाले आहे का ? याची माहिती मागितली असता सेफ्टी ऑडिट झालेच नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ही माहिती उघडकीस आणणाऱ्या त्या कार्यकर्त्यांचे कौतुक करून त्याचे मनोबल वाढविण्याची आवश्यकता होती. मात्र एका माजी मंत्र्याने यात हस्तक्षेप करीत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न चालविला असल्याने संताप व्यक्त होत आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email