अनिल अंबानी साठी देश विकायला काढला का ?? – मनसे अध्यक्ष राज ठाकरे

जी गोष्ट तुम्हाला वाचता आली असती ती तुम्ही वाचवली नाही. उत्तर आयुध आपल्याकडे आहेत तिला बेशुद्ध करून सर्वधन करता आलं असतं वाघ दुर्मिळ होत आहेत ज्यांचे प्राण गेले आहेत. त्यांचाही वाटतय अशा गोष्टी जगभरात घडत असतात. ज्या ठिकाणी वन्यप्राण्यांच वास्तव्य असतं तिथे वसाहती वसल्या तर अशा घटना घडतात असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.

अवनी वाघिणीला ठार केल्यानंतर सरकार वर विशेषतः वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीका होत आहे. याबद्दल राज ठाकरे म्हणाले किया विषयावर सुधीर मुनगंटीवार बेफिक्रे पणे उत्तर देत आहेत. ते वनमंत्री आहेत याचा अर्थ त्यांना वनातलं सगळं कळतं किंवा त्यावर ते सर्च करत होते असे नाही ते आता मंत्री झाले आहेत उद्या मंत्रीपद जाईल. त्यामुळे मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारीने बोलावे टी वन वाघिणीला ठार केल्यानंतर तिचे दोन बछडे अनात झाले आहेत.

यावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आज त्या वाघिणीची दोन बछडे सापडत नाही ते कुठे असतील म्हणजे एक जीव गेला त्यासोबत आणखीन दोन जीव जाणार यांना सत्तेचा माज आला आहे. आम्ही काहीही केल तर आम्हाला काही होणार नाही मला वाटतंय घोडा मैदान जवळ आहे. याचा माज उतरण अत्यंत आवश्यक आहे. असे ते म्हणाले.

अनिल अंबानी च्या प्रकल्पासाठी वाघिणीला ठार केल्याचा आरोप सरकारवर होत आहे. याशिवाय राज ठाकरे यांनी सरकारवर अनेक प्रश्न विचारले आहेत. वाघिणीला जिथे मारलं तिथून 60 किमी अंतरावर अनिल अंबानी चा प्रकल्प येत आहे. अनिल अंबानी साठी देश विकायला काढलाय? का अनिल अंबानी या सगळ्या गोष्टी करणार त्याच्यासाठी सरकार विकले गेलंय? त्यासाठी काम करत आहात का? इतक भान सुटलं सरकारचं? कोण अनिल अंबानी? धेंडं सरकारने पोसावी आणि त्याचं नुकसान महाराष्ट्र आणि देशांनी सोसायचं असं राज ठाकरे यांनी म्हंटले.

तसंच राज्यातील सरकार हे मोदी सरकारच्या आशीर्वादाने बसला आहे ते आहेत तोपर्यंत हे आहेत. त्यांना माज आहे म्हणून यांना माज असल्याची टीकाही केली वाघ दुर्मीळ प्रजाती आहे. पुतळे उभारून वाढत नसतात हीच गोष्ट गुजरात मध्ये सिंहांच्या बाबतीत घडली असती. तर केवढा हंगामा झाला असता वन प्राण्यांच्या भागात घुसून नये कोणी जागा असताना जंगलातच का शिरायचं असतं
यांना काही कर्तव्य नाही कोण जगते मरतय याच त्यांना देन-घेन नाही त्यांना फक्त पुतळे उभारायचे आहेत तिथे वल्लभभाईंचा उभा करायचा इथे वाघाचे पुतळे उभे करायचे बस पुतळे उभे करा सर्वाधिक वाघ असलेले जगात एकमेव जागा आहे आणि ती म्हणजे मुंबईतील नॅशनल पार्क ही जागा अनधिकृत इमारती आणि झोपड्यांनी केली जाते अशा परिस्थितीत सरकारचं लक्ष नसेल तर हे प्राणी तुमच्या घरात घुसणारच आहेत नाही तर जातील कुठे असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email