शेतात ज्वारी कापणीचे काम करताना वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू

जळगाव दि.०१ :- ज्वारी कापणीचे काम करीत असताना शेतात अंगावर वीज पडून पाच जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घटना गुरुवारी दुपारी धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथे घडली. या घटनेत ठार झालेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाखांची मदत शासनाकडून केली जाईल अशी घोषणा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

हेही वाचा :- ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे दु:खत निधन

रघुनाथ पाटील यांच्या शेतात गुरुवारी ज्वारी कापणीचे काम सुरू होते. सर्वजण काम करीत असताना दुपारी अचानक ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी सर्वजण एका झाडाच्या खाली उभे होते. अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेत सर्वांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे भवरखेडा गावावर एक शोककळा पसरली आहे.

हेही वाचा :- जिल्ह्यात आज एक उमेदवारी अर्ज दाखल

या घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस तसेच महसूल यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेसोबतच जोरदार पावसालाही सुरुवात झाली, त्यामुळे भवरखेडा शेतशिवारातील नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आला. पुरामुळे घटनास्थळी पोहचणे देखील कठीण झाले होते. सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास पावसाचा जोर ओसरला.

दिल्लीच्या तख्तापुढे झुकणे आम्हाला माहित नाही… सगळ्यात मोठा विनोद

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email