मच्छिमारांनी समुद्रात जावू नये ; पर्यटकांनी समुद्र किनारी जाणे टाळावे आपतकालीन यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना

ठाणे दि.०४ :- अरबी समुद्रात महा नावाचे चक्रीवादळ निर्माण झाले असून हे चक्रीवादळ ६ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत धडकणार आहे. या वादळाचा फटका ठाणे जिल्ह्याला बसण्याची बसणाशक्यता असल्याने जिल्ह्यातील आपतकालीन यंत्रणांनी सज्ज राहावे अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. राजेश नार्वेकर दिल्या. आज समिती सभागृहात प्रशासकीय यंत्रणेच्या पूर्व तयारीचा आढावा घेवून आपतकालीन परिस्थिती सामना करणाऱ्या सर्व संबधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी ठाणे जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, निवासी जिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील उपस्थित होते.

हेही वाचा :- कांदिवलीत इमारतीच्या आठव्या मजल्यावरून खाली पडून कामगाराचा मृत्यू

मच्छिमारांनी समुद्रात जावू नये

जिल्ह्यातील मच्छिमारांनी पुढील तीन दिवस (दि. 8 नोव्हेंबर पर्यंत) मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, जे मच्छिमार समुद्रात गेले आहेत त्यांनी तातडीने परत यावे. परतताना जवळच्या बंदरांवर आसरा घ्यावा, असे आवाहन श्री. नार्वेकर यांनी केले.

हेही वाचा :- कल्याण- अहमदनगर महामार्गावर अद्न्यात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यु

समुद्रकिनारी पर्यटकांनी जाणे टाळावे

तसेच सुट्टीचा कालावधी असल्याने समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या वादळाचा संभाव्य धोका लक्षात घेवून पर्यटकांनी समुद्र किनारी जाणे टाळावे असे आवाहन त्यांनी केले. नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्या मुंबई, पुणे येथे तैनात असून आवश्यकता भासल्यास त्यांची मदत घेतली जाईल असेही ते म्हणाले.

हेही वाचा :- नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करुन तात्काळ अहवाल पाठवा – कृषी राज्यमंत्री सदाभाउ खोत

कर्मचार्यांनी मुख्यालय सोडू नये: रजेवर असणाऱ्यांनी हजर व्हा

पालिका, महसूल, आरोग्य, वैदकीय पथक, आपत्तीव्यवस्थापन आणि इतर सर्व यंत्रणाच्या अधिकारी- कर्मचारी वर्गाने मुख्यालयात राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच रजेवर असणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांच्या रजा रद्द करून हजर होण्याचे सूचना दिल्या चक्रीवादळामुळे पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून समुद्र किनाऱ्यालगतच्या गावांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पत्र्याची कच्ची घर, झोपड्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांचे पक्क्या घरामध्ये स्थलांतर करणे, शेतकऱ्यांनी काढून ठेवलेली पिकं आणि बाजार समितीत आलेल्या अन्नधान्याची नासाडी होऊ नये यासाठी उपयोजना करण्याच्या करण्याच्या सूचना निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांनी दिल्या . या बैठकीला विविध महानगर पालिकेचे अधिकारी, आरोग्य, कृषि, पशुसंवर्धन, पोलीस आणि इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email