पंधरावा वित्त आयोग देणार मिझोरामला भेट
आपल्या शिफारशी सादर करण्यापूर्वी देशातल्या विविध राज्यांना भेट देण्याचा एक भाग म्हणून 15 वा वित्त आयोग मिझोराम राज्याला 25 आणि 26 मार्च 2019 रोजी भेट देणार आहे. आयोगाने राज्यांना भेट देण्याच्या यादीतील मिझोराम हे 20 वे राज्य आहे.
या भेटीपूर्वी मिझोरामच्या प्रमुख महालेखापालांनी आज नवी दिल्लीत आयोगाच्या सदस्यांची भेट घेऊन मिझोराम सरकारच्या वित्त स्थितीबाबत माहिती दिली. मिझोराम भेटीचा एक भाग म्हणून आयोग राज्याचे मुख्य सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर विस्तृत बैठक घेतील. तसेच राज्याचा वित्त, नगर तसेच ग्रामीण विकास विभागही आयोगासमोर सादरीकरण करतील.