जागतिक महिला दिना निमित्त धवलारीन व सुईन महिलांचा सत्कार.

(विठ्ठल ममताबादे)

उरण दि.०९ – केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था वेश्वी, रोटरी क्लब सनराइज पनवेल, सारडे विकास मंच, गोल्डन ज्युबली मित्र मंडळ सारडे, सुयश क्लासेस आवरे, कै. मधुकर ठाकुर प्रतिष्ठान आवरे, जाणता राजा ग्रुप वशेणी, कडापे आवरे मच्छीमार सोसायटी, श्री गणेश महिला मंडळ बचत गट पिरकोन,समर्थ चषक पिरकोन, साई इलेवन ग्रुप आवरे, आम्ही पिरकोनकर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समाजात धवलारीन व सुईन चे काम करणाऱ्या महीलांचा सत्कार करून त्यांचा कार्याचा गौरव पिरकोन येथे करण्यात आला. आगरी कोळी कराडी समाजाचे, संस्कृतीचे महत्वाचे घटक असलेल्या धवलारीन व सुईन यांचा सत्कार समारंभ पिरकोन येथे आयोजित करण्यात आला. यावेळी राजू मुंबईकर-प्रेसिडेंट रोटरी क्लब सनराइज पनवेल तथा अध्यक्ष केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था वेश्वी,नागेंद्र म्हात्रे-अध्यक्ष सारडे विकास मंच, कौशिक ठाकुर-अध्यक्ष कै. मधुकर ठाकुर प्रतिष्ठान आवरे, माधव म्हात्रे-गोल्डन ज्युबली मित्र मंडळ सारडे,निवास गावंड-सुयश क्लासेस आवरे,गुरुप्रसाद म्हात्रे-चेअरमेन कडापे आवरे मच्छीमार सोसायटी, लक्ष्मी गावंड-श्री गणेश महिला मंडळ बचत गट पिरकोन,गणेश गावंड- साई इलेवन ग्रुप आवरे,मुकुंद गावंड-अध्यक्ष समर्थ चषक पिरकोन,सुनील वर्तक-माजी सचिव उरण समालोचक असोसिएशन,मनोहर कोळंबे-कॉमेडीयन(‘टाइमपास 1’ चित्रपट),संगीता म्हात्रे-ग्रामपंचायत सदस्य पिरकोन, प्रियंका पाटिल-सामाजिक कार्यकर्त्या,सीमा भोईर-पत्रकार दैनिक लोकसत्ता,सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार विठ्ठल ममताबादे, पंकज ठाकुर आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा :- महिलांचा आत्मसन्मान करणे आपले कर्तव्य आहे – मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे

धवलारीन म्हणजे लग्नात गाणे गाणारी स्त्री तर सुईन म्हणजे गरोदर स्त्रीचे बाळंतपण करणारी स्त्री.जुन्या काळात जेंव्हा समाजात दळणवळणाच्या कोणत्याही सुविधा नव्हत्या अश्या परिस्थितीत गरोदर महीलांचे बाळंतपण हे सुईन म्हणून काम करणाऱ्या महिला करीत असत.आगरी कोळी कराडी समाजात वेगवेगळे सण,विधी साजरे केले जातात त्यातील महत्वाची विधी,सण म्हणून लग्नाकडे पाहिले जाते अश्या लग्नात गायिकेच्या भुमिकेत धवलारीन मुख्य भूमिका पार पाडत असतात. आगरी कोळी कराडी समाजात लग्न कार्यात धवला शिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाही. आजच्या चित्रपट,विविध संगीत चॅनेल,सोशल मीडियाच्या युगातही पूर्वी प्रमाणेच धवलारीन यांना महत्वाचे स्थान आहे.आज परिस्थिति वेगळी आहे. आज खेडोपाडी सर्व सुविधा पोहोचल्या आहेत. तरीही धवलारीन व सुईनचे महत्व आजही अबाधितच आहे. समाजातील उपेक्षित स्त्रियांचा विकास झाला पाहिजे, त्यांनाही मान सन्मान मिळाला पाहिजे, त्यांच्या कार्याचा यथोचित सत्कार झाला पाहिजे तसेच आगरी कोळी कराडी संस्कृती जतन करण्याच्या दृष्टिकोणातून धवलारीन व सुईन महिला भगिणींचा सत्कार करण्यात आल्याचे मत केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजू मुंबईकर यांनी कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समालोचक आतिश पाटिल तर आभार प्रदर्शन सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांनी केले. उरण मधील विविध सामाजिक संघटना तसेच नागरीकांनी या आगळया वेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले असून धवलारीन व सुईन काम करणाऱ्या महीलांचा योग्य सन्मान करण्यात आल्याचे मनोगत विविध सामाजिक संस्था व नागरीकांनी व्यक्त केले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email