मातोश्रीबाहेरुन पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल
मुंबई दि.०५ :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला लहान मुलीसह पोलीसांनी जबरदस्तीने मातोश्रीबाहेरुन ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्याच नाव देशमुख असून ते आपल्या समस्या घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटायला आल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, त्यांना भेटण्यास नकार देत पोलीसांनी धक्काबुक्की करत ताब्यात घेतले. सदर शेतकरी हे कर्जाच्या विळख्यात सापडलेले होते. तसेच त्यांनी आपली समस्या घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा वारंवार प्रयत्न केला होता. त्यांची भेट होऊ शकली नव्हती.
हेही वाचा :- Kalyan ; घरासमोरील बांबू काढण्यास रोखल्याने बेदम मारहाण
अखेरीस आज ते आपल्या लहान मुलीसह मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर आले. मात्र तेथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना अडवले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना आणि त्यांच्या मुलीला ताब्यात घेतले. यावेळी या शेतकऱ्यासह छोट्या मुलीला धक्काबुक्की झाली. दरम्यान, पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.
हेही वाचा :- Dombivali ; बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्जावर मोबाईल घेणारा भामटा बेपत्ता
संबंधीत शेतकऱ्याचे काय काम आहे, याबाबत विचारपूस करुन त्यांना मुक्त करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सदर शेतकऱ्याला आणि त्यांच्या मुलीला पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये बसवले. त्यानंतर त्यांना खेरवाडी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. तेथे त्यांच्याकडून प्राथमिक माहिती घेण्यात येत आहे. दरम्यान, मातोश्रीबाहेर दिवसभरातून अनेकजण येतात. त्यामुळे अशा प्रकारे आम्हाला वागावे लागते, अशी प्रतिक्रिया पोलीसांनी दिली आहे.