ठाकरे सरकारची शेतकरी कर्जमाफी ही अकबराच्या न शिजणाऱ्या( खिचडी) बिर्याणी सारखी
Hits: 0
नागपूर दि.२२ :- ठाकरे सरकारची शेतकरी कर्जमाफी ही अकबराच्या न शिजणाऱ्या( खिचडी) बिर्याणी सारखी आहे. ३० सप्टेंबरपर्यंत कर्जमाफी दिल्याने आक्टोबर आणि त्यानंतर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार नाही, तर शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदतीबाबत काही बोलायलाच तयार नाहीत. विदर्भाला आजोळ म्हटले आणि आजोळी आलेल्या नातवाच्या सरकारने टोप्याच लावल्या. ना कोणती ही नवी घोषणा केली. ना महिला सुरक्षेसाठी काही दिले, ना नवा प्रकल्प दिला… पहिल्याच वेळी आजोळी आलेला नातू नुसते भावनिक भाषण करुन चालला गेला!शेतकऱ्यांसाठी आता स्वतःच कशा फुटपट्या लावायला सुरुवात केलीय..
शेतकऱ्यांसाठी आता स्वतःच कशा फुटपट्या लावायला सुरुवात केलीय..
ना अवकाळीग्रस्तांना २५ हजार रुपये दिले,ना सातबारा कोरा केला, सरसकट कर्ज माफी नाहीच, जी घोषणा केली ती पण फुटपट्यांचीच. अवकाळीने धानच गेलं, हे सरकार म्हणे धानाला बोनस देऊ. पण बळीराजा हताश होऊ नकोस आम्ही तुझ्यासाठी संघर्ष करु, अशा शब्दांत आमदार अँड. आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.