कोळशाच्या नव्या खाणीचा शोध
नवी दिल्ली, दि.२२ – देशात कोळशाच्या नव्या खाणीचा शोध घेण्याचे काम मंदावलेले नाही. दरवर्षी देशाच्या कोळसा साठ्यात अशा नव्या खाणीच्या माध्यमातून 1 ते 3 दशलक्ष टन कोळशाची भर पडते. कोळशाच्या नव्या खाणी शोधण्यासाठी 2013-14 या वर्षात 1.51 लाख मीटर खोदकाम करण्यात आले होते त्या तुलनेत 2017-18 या वर्षात 1.76 लाख मीटर खोदकाम करण्यात आले. कोळशाच्या नव्या खाणींचा शोध अत्याधुनिक तंत्रज्ञानाचीही मदत घेतली जात आहे. केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि वित्त मंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
Please follow and like us: