देशभरात नैसर्गिक वायू वाहिनी जाळ्याचा विस्तार
नवी दिल्ली, दि.१४ – देशातील राष्ट्रीय नैसर्गिक वायू जाळे आणि शहरी वायू वितरण जाळ्याचा विकास करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. देशातील जनतेला नैसर्गिक वायू उपलब्ध व्हावा यासाठी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. सध्या 16 हजार 788 कि.मी. लांबीची नैसर्गिक वायू वाहिन्या कार्यरत असून आणखी 14 हजार 239 कि.मी. लांबीच्या वायू वाहिन्यांचा विकास करण्यात येत आहे.
हेही वाचा :- तिसऱ्या भारत-जपान पर्यावरण परिषदेचे नवी दिल्लीत आयोजन
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने या वाहिन्यांना मंजुरी दिली आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर देशभरातील 26 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या 280 जिल्ह्यात 178 क्षेत्रांमध्ये नैसर्गिक वायू उपलब्ध होईल. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.