मुंब्रा पोलिसांकडून हद्दपार इसम जेरबंद

ठाणे दि.१४ :- ठाणे रेकॉर्डरवरील हद्दपार करण्यात आलेल्या इसमास मुंब्रा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आरिफ मोहम्मद मोहसीन खान असे या इसमाचे नाव असून हा इसम ठाणे जिल्ह्याच्या महसुली हद्दीतून २ वर्षांकरीता हद्दपार करण्यात आलेला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, वपोनिरी मधुकर कड यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंगचे काम करत होते. हे काम करत असताना आरिफ मोहम्मद मोहसीन खान हा हद्दपार केलेले असताना सुद्धा या आदेशाचा भंग करून विनापरवाना हद्दपार क्षेत्रात लपून छपून फिरत असताना दिसला. त्यामुळे या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा :- तडीपार गुन्हेगाराला कल्याण क्राईम ब्राँच कडून अटक….

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email