पर्यावरणमंत्र्यांच्या हस्ते भारताच्या राष्ट्रीय आरईडीडी धोरणाचे प्रकाशन

मुंबई, दि.३० – पर्यावरण बदलाविषयीच्या पॅरिस कराराच्या अंमलबजावणीसाठी भारत कटिबद्ध असून पर्यावरणाच्या प्रभावी रक्षणासाठी आदिवासी, वनवासी आणि एकूण समाजाचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे असे मत केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामानबदल मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केले. डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत आरईडीडी म्हणजेच जंगले नष्ट होत असल्यामुळे होणारे उत्सर्जन रोखण्याविषयीच्या भारताच्या राष्ट्रीय धोरणाचे प्रकाशन झाले त्यावेळी ते बोलत होते. देशात उत्तम पर्यावरण राखण्यासाठी जंगले सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. या धोरणामुळे स्थानिक समुदायांची शाश्वत जीवनशैली कायम राखत जैव विविधतेचे संवर्धनही करता येईल असे ते म्हणाले.

हे धोरण ठरवण्यासाठी तज्ञ समितीने केलेल्या अभ्यासाचे कौतुक केले. पॅरिस कराराच्या अंमलबजावणीसाठी हे धोरण एक महत्वाचे साधन ठरेल असे ते म्हणाले. या धोरणांतर्गत जंगलांचे संवर्धन करुन हवामान बदलाच्या संकटाचा सामना केला जाऊ शकतो. या धोरणाचा आराखडा लवकरच युएनएफसीसीकडे पाठवला जाईल असेही त्यांनी सांगितले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email