निवडणूक आयोग सुगम्य निवडणुकांसंबंधी राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करणार
नवी दिल्ली, दि.०२ – केंद्रीय निवडणूक आयोग नवी दिल्लीत ३ जुलै २०१८ रोजी सुगम्य निवडणुकांसंबंधी दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत या चर्चासत्राचे उद्घाटन करणार आहेत. दिव्यांग व्यक्तींवर या चर्चासत्रात विशेष भर देण्यात येणार आहे. उद्घाटनपर सत्रात ‘सिस्टेमेटिक वोटर्स एज्युकेशन ॲण्ड इलेक्टोरल पार्टीसिपेशन (स्वीप)’ या समर्पित पोर्टलचेही उद्घाटन करण्यात येणार आहे.
या चर्चासत्राला निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, अशोक लवासा यांच्यासह सर्व राज्यांचे मुख्य निवडणूक अधिकारी तसेच दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या नागरी संघटनांचे प्रतिनिधी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
दिव्यांग व्यक्तींना मतदान करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्यावर तोडगा काढणे हा या चर्चासत्राचे उद्देश आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये दिव्यांग व्यक्तींचा सहभाग वाढावा यासाठी प्रयत्न केले जातील.