शहर प्रशासनाकडून गुणवत्तापूर्ण जीवनमानाची आकांक्षा बाळगणाऱ्या नागरिकांना सक्षम करण्यासाठी सुलभ जीवनमान निर्देशांक
नवी दिल्ली, दि.१६ – गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयाने 13 ऑगस्ट 2018 रोजी प्रसिद्ध केलेल्या सुलभ जीवनमान निर्देशांकाने मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण केली असून शहर नियोजक, पालिका प्रशासन आणि जनतेला खुल्या चर्चेसाठी प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली आहे. ही विशिष्ट पद्धत असून शहरांच्या खुल्या आणि सहभागात्मक मूल्यमापनावर तसेच शहरी निकषांच्या पारदर्शक परीक्षणावर आधारित आहे.
19 जानेवारी 2018 रोजी या मूल्यमापनाला प्रारंभ झाला. पारदर्शकता आणि तटस्थता हे या पद्धतीचे महत्त्वाचे घटक आहेत.
गुणवत्ता नियंत्रण आणि गुणवत्ता आधरित परीक्षणाच्या दोन फेऱ्या आयोजित करण्यात आल्या होत्या आणि त्यात काही त्रुटी आढळल्या. या त्रुटी भरून काढण्याची संधी प्रत्येक शहराला देण्यात आली. त्यानंतर परीक्षण झाले.
Please follow and like us: