मेडीक्विन मिसेस महाराष्ट्र स्पर्धेत कल्याणच्या डॉ. अस्मिता कुकडे ठरल्या एक्सलंट ऑरेटोर
Hits: 4
कल्याण :- नुकतीच पुणे येथे पार पडलेल्या मेडीक्विन मिसेस महाराष्ट्र 2020 या महिला डॉक्टरांसाठी आयोजीत केलेल्या सौंदर्य स्पर्धेत कल्याणच्या डॉ. अस्मिता संजय कुकडे या एक्सलंट ऑरेटोर पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. महाराष्ट्रात पहिल्यांदाच महिला डॉक्टरांसाठी मेडीक्विन मिसेस महाराष्ट्र 2020 या स्पर्धेचे पुण्यातील बालेवाडी येथील ऑर्किड हॉटेलमध्ये आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा :- शहरांवर पडलेला घाणेरडा डाग पुसण्यासाठी धडपड सुरू स्मार्ट सोसायट्यांसाठी केडीएमसीसह रोटरीचा अभिनव उपक्रम
या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत महाराष्ट्रातील सुमारे 250 महिला डॉक्टर्स सहभागी झाल्या होत्या. त्यातून 65 डॉक्टरांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. स्पर्धकांचे व्यक्तिमत्व, आत्मविश्वास, संवाद कौशल्य व सामाजिक कार्य या निकषावर हि निवड करण्यात आली. डॉ. अस्मिता कुकडे या कल्याण पूर्व विभागात वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत. त्यांचा अनेक सामाजिक संस्थांच्या कार्यात सहभाग आहे.
हेही वाचा :- पहिल्या टप्प्यातील पुणे मेट्रो एप्रिलपासून धावणार
महिलांना होणारा स्तनांचा व गर्भाशयाचा कॅन्सर, मासिक पाळीमधील समस्या, याबाबत त्या मार्गदर्शन करीत असतात. तसेच कुटुंब नियोजन व आरोग्य विषयक कार्यक्रम राबवीत असतात. त्याचप्रमाणे महिलांसाठी विनामुल्य योग प्रशिक्षण वर्ग चालवितात. तसेच झोपडपट्टी विभागातील नागरिकांना वैद्यकीय मदत करीत असतात. डॉ. अस्मिता कुकडे एक्सलंट ऑरेटोर पुरस्काराच्या मानकरी ठरल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.