डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या 63 व्‍या महापरिनिर्वाण दिनानिमित्‍त आदरांजली

Hits: 1

डोंबिवली दि.०६ :- भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या 63 व्‍या महा‍परिनिर्वाण दिनानिमित्‍त शुक्रवारी त्‍यांना कल्‍याण-डोंबिवली महानगरपालिकेतर्फे भावपूर्ण आदरांजली वाहण्‍यात आली. कल्याण आणि डोंबिवलीच्या विभागीय कार्यालयात आदरांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कल्‍याण पश्चिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या पूर्णाकृती पुतळ्यास उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी पुष्‍पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. त्‍याचप्रमाणे महापालिका मुख्‍यालयातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेस उपमहापौर उपेक्षा भोईर, परिवहन सभापती मनोज चौधरी यांनी पुष्‍पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.

हेही वाचा :- जलवाहतूक योजनेत शासनाची दिरंगाई खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उठवला आवाज

याप्रसंगी पालिका शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्‍ली), उपायुक्‍त तथा जनसंपर्क मारुती खोडके, उपायुक्‍त उमाकांत गायकवाड, कार्यकारी अभियंता यशवंत सोनावणे, पालिका सदस्‍य रमेश जाधव, महापालिका सचिव संजय जाधव, लेखाधिकारी विनय कुलकर्णी, सहाय्यक आयुक्‍त अरुण वानखेडे, मालमत्‍ता व्‍यवस्‍थापक प्रकाश ढोले त्‍याचप्रमाणे अनेक अधिकारी व बहुसंख्‍य कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

हेही वाचा :- हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील चार आरोपींयांच्या एनकाउंटर

तर डोंबिवलीच्या विभागीय कार्यालयातही फ प्रभागक्षेत्र अधिकारी दिपक शिंदे, ग प्रभागक्षेत्र अधिकारी चंद्रकांत जगताप यांनी डोंबिवली विभागीय कार्यालयालगतच्‍या पुर्णाकृती पुतळ्यास, तसेच कार्यालयातील डॉ. आंबेडकर सभागृहातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेस पुष्‍पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.

Leave a Reply

Your email address will not be published.