मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास आता करा या नंबरवर तक्रार

मोबाईल फोन हरवला अथवा चोरीला गेल्यावर तुम्ही पोलिसांकडे तक्रार दिली तरी तुमचा फोन सापडण्याची शक्यता जवळपास नसते. या कटकटीपासून आता तुमची सुटका होण्याची शक्यता आहे. दुरसंचार विभाग यासाठी आता एक तरतुद करणार आहे. सरकार एक हेल्पलाईन नंबर यासाठी सुरु करणार आहे. 14422 हा तो क्रमांक असणार आहे. या नंबरवर तक्रार करुन तुम्ही तुमचा फोन हरविल्याचे सांगू शकता. 14422 नंबर डायल करुन तुम्ही संदेश पाठविल्यावर तक्रार दाखल होणार आहे. त्यानंतर फोन हरविल्याची सूचना संबंधित पोलिसांना आणि सेवा प्रदान कंपनीला देण्यात येईल. यामुळे तुमचा हरवलेला फोन हरविण्यासच मदत होणार नाही तर तुम्हाला विमा मिळण्यासही मदत होणार आहे. कारण तक्रार दाखल केल्यानंतर तुम्हाला एफआरआय कॉपीसाठी फिरण्याची गरज नाही.

महाराष्ट्र सर्कलमध्ये सगळ्यात पहिली सुविधा

दूरसंचार विभागाकडून महाराष्ट्र सर्कलमध्ये सगळ्यात पहिली ही सेवा सुरु करण्यात येणार आहे. देशातील अन्य 21 दुरसंचार सर्कलमध्ये डिसेंबरअखेर ही सेवा सुरु होईल. या प्रकल्पाचे नाव सेट्रल इक्विपमेंट आयडेंटी रजिस्टर (CIIR) असे असणार आहे. दूरसंचार विभागाद्वारे तयार करण्यात येणार या रजिस्टरमध्ये प्रत्येक नागरिकांच्या मोबाईलची माहिती असणार आहे.

सी-डॉटने डिझाईन केले मॉडल

दूरसंचार प्रौद्योगिकी केंद्र (सी-डॉट) ने चोरी किंवा हरवलेला मोबाईल शोधण्यासाठी हे मॉडेल विकसित केले आहे. सीआयआयआरकडे देशातील प्रत्येक नागरिकाच्या मोबाईलचे मॉडेल, सिम नंबर आणि आयएमईआय नंबर आहे. मोबाईल मॉडेलवर निर्माता कंपनीद्वारे जारी आयएमईआय नंबरशी जुळणारे तंत्रज्ञान सी-डॉटने विकसित केले आहे. हे तंत्रज्ञान हळूहळू पोलिसांकडे सोपविण्यात येणार आहे. आयएमईआय नंबर बदलल्यावर या मोबाईलची सेवा बंद करण्यात येईल. मोबाईलची सेवा बंद झाली तरी पोलिस तो ट्रॅक करु शकतात.

तक्रार केल्यावर मोबाईल काम करु शकणार नाही

सी-डॉट अनुसार चोरी गेलेल्या मोबाईलमध्ये सिम टाकले तरी त्याला कोणतेही नेटवर्क मिळणार नाही. पण या फोनचे ट्रॅकिंग करता येणार आहे. मागील काही वर्षात रोज हजारो मोबाईलची चोरी होत आहे. त्यामुळे दुरसंचार विभागाने सी-डॉटला हे तंत्रज्ञान विकसित करण्यास सांगितले होते. एका सर्वेत समोर आले होते की एका आयएमईआय नंबर वर 18 हजार हॅडसेट चालू आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email