पर्सनल गोष्टि सोशल मिडियावर टाकू नका.

Hits: 1

{विट्ठल ममताबादे}

उरण दि.२९ :- महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात 23/1/2017 मध्ये पर्सनल गोष्टि फेसबुकवर,व्हॉट्स ऍप वर टाकल्याने पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती.या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली होती. त्या घटनेला आज 3 वर्षे पूर्ण झाली अंगावर काटा आणणारी ही घटना आजही आठवते. येथे थोडे सविस्तर सांगत आहे.कोणाच्या बदनामीचा मुळीच हेतु नाही. सोशल मीडिया वरील सावधानतेसाठी आणि सतर्कतेसाठी हा लेख आपणा पर्यंत पोहोचवित आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पत्नीची हत्या करण्यापूर्वी पतीने सुसाइड नोट लिहिली होती.त्यात ‘चार वर्षापुर्वी लग्न झाले होते.त्यांना मूल होत नव्हते.घरातील समस्या आणि कुटुंब नियोजनाबद्दल घेत असलेल्या उपचाराविषयी व्हाट्स अप व फेसबुक द्वारे मित्र मैत्रिणीला सांगत असल्याच्या कारणावरून आपल्याला पत्नीचा राग येत होता’ असे पतीने मृतूपूर्वी लिहिलेल्या चिट्टीत नमूद केले होते.पती पत्नी दोघेही उच्च शिक्षित होते.पती एका खाजगी आयटी कंपनीत कामाला होते.उच्चशिक्षित पतीकडून असा प्रकार झाल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र अश्या घटनांमुळे प्रत्येकाने सोशल मीडियाच्या बाबतीत अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

वृत्तपत्रात सुद्धा ही बातमी प्रसिद्ध झाली होती या बातमी ने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवून टाकली होती.हीच एक घटना आहे असे नाही या पूर्वीही वेगवेगळ्या घटना घड़ल्या आहेत. लग्ना अगोदर प्रियकर प्रियसी तसेच लग्ना नंतर पती पत्नी यांचे शारीरिक संबंधाचे एकमेकांना पर्सनली पाठविलेले वीडियो सुद्धा व्हायरल(सार्वजनिक)झालेले आहेत.यातून ब्लैक मेलींगच्या घटना सुद्धा घडत असतात. मात्र आपली समाजात इज्जत जाईल,आपले नाव खराब होईल या भीती पोटी या ब्लैकमेलींगच्या अनेक घटना उजेडात येत नाहीत.

त्यामुळे आज सोशल मिडियावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. प्रश्न असा आहे की सोशल मिडियाचा वापर आज खरच विधायक कार्यासाठी होत आहे का ? आपण अनेक वेळा नको त्या गोष्टि दुसऱ्यांना शेयर करत असतो.मात्र समोरच्या व्यक्तीच्या भावना आपण जाणून घेत नाही.सोशल मिडियावर टाकलेल्या अनेक पोस्ट,गोष्टि या अनेकदा एकमेकांना विश्वासात न घेता टाकल्या जातात.फेसबुक,व्हाट्स अप आदि सोशल मिडियावर टाकलेली माहिती,एखादी घटना,किंवा वयक्तिक गोष्टि हे सोशल मिडियावर सर्वजन बघत असतात.

घरातील एखादी न सांगण्यासारखी बाब एखाद्या व्यक्तीला जरी तुम्ही व्हाट्स अपवर,फेसबुक आदि सोशल मिडियावर पाठविला तरी ती माहिती वयक्तिक न राहता कधीही सार्वजनिक होवू शकते.त्यामुळे अनेक महत्वाच्या गोष्टि,पर्सनल घटना,पर्सनल गोष्टि सोशल मिडियाचा वापर करणाऱ्यांनी(यूजर नी) सोशल मिडियावर टाकू नये.सोशल मिडियावर टाकलेल्या पर्सनल गोष्टि या कधीच पर्सनल राहत नसतात.त्यामुळे सोशल मिडियाचा वापर करताना व्हाट्स अप,फेसबुक वर काय टाकावे काय टाकू नये याचा सारासार विचार करणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी लग्ना अगोदार असलेले मैत्रीचे फोटो,गोष्टि याद्वारे विवाहित स्त्रीला अडचणीत आनण्याचे (ब्लॅक मेलींगचे) अनेक प्रकार होत असतात.

त्यामुळे काही गोष्टींच्या बाबतीत स्त्री आणि पुरुष दोघांनीही काळजी घेणे महत्वाचे आहे.पती पत्नी या दोघांनीही आपल्या जीवनात,संसारात कटुता येईल असे कोणत्याही प्रकारचे वर्तन करू नये.कौटुंबिक वादविवाद सोशल मिडिया वर तर टाकुच नये.कॉलेज मधील व्यसनी मुले,प्रेम प्रकरणातील मुले मूली अनेक गोष्टि व्हाट्स अप फेसबुक आदि द्वारे एकमेकांना चैटिंग द्वारे संवाद साधत असतात.हे संवादही कालांतराने कधी कधी धोकादायक व प्राणघातक ठरतात.सोशल मिडियावर केलेली चैटिंग सेव करता येत(कधीही बघता येत) असल्याणे त्याचा गैरवापर कधीही आणि कुठेही खूप मोठया प्रमाणात होवू शकतो.गरज आहे ती सतर्क राहण्याची.

आपली सावधानताच आपल्याला अनेक गोष्टितुन,समस्यापासून आपल्याला वाचवू शकते.आजचे काळ हे स्पर्धेचे आहे.सोशल मिडियाचे हे युग आहे.मात्र त्याचा अतिरेक हा वाईट आहे.पती पत्नी नी काय शेयर करावे काय शेयर करू नये किंवा लग्ना अगोदरच्या प्रियकर(मित्र)आणि मैत्रिणी(प्रियसी) ने काय शेयर करावे,काय शेयर करू नये हा ज्याचा त्याचा वयक्तिक प्रश्न आहे.मात्र हे सर्व करताना नाणाच्या दुसऱ्या बाजुचाही विचार होणे गरजेचे आहे.संवाद,प्रेम,विश्वास,परस्पर सहकार्य हे दोन्ही बाजूंनी झाले पाहिजे.सामंजस्यपणाने वागल्यास अनेक गोष्टिवर मात करता येते.

सोशल मिडियावर पोस्ट(मेसेज) टाकताना प्रत्येक व्यक्तींला विश्वासात घेतले पाहिजे.विधायक गोष्टिसाठी सोशल मिडियाचा वापर करता आले पाहिजे.आज पासून आपण एक नविन संकल्प करुया की कोणत्याही पर्सनल गोष्टि या सोशल मिडियावर टाकनार नाही आणि कोणाला टाकू देणार नाही.अश्या प्रकारे उचललेले एक पाऊल एखादे उद्ध्वस्त होणाऱ्या पती पत्नीचे आयुष्य वाचवू शकते.किंवा एखाद्या व्यक्तीला ब्लॅक मेकिंगच्या होणाऱ्या परिणामा पासून वाचविता येते.खाजगी गोष्टि सोशल मिडियावर शेयर करणार नाही अशी प्रतिज्ञा प्रत्येकाने करून स्वतः आनंदी जीवन जगण्याचा व दुसऱ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करुया.
व्हाट्स अप नंबर-9702751098.

Leave a Reply

Your email address will not be published.