मला हिंदूह्र्दयसम्राट म्हणू नका…
गोरेगाव येथे नुकतेच मनसेचे महाअधिवेशन पार पडले. या अधिवेशनात राज ठाकरे यांच्या मनसेने हिंदुत्वाची वाट स्वीकारल्यानंतर सोशल मीडिया सह विविध स्तरावर राज ठाकरेंना हिंदुहृदयसम्राट म्हणू लागले. मात्र काल झालेल्या बैठकीत मला हिंदूह्र्दयसम्राट म्हणू नका तो मान केवळ बाळासाहेबांचा आहे. मी बाळासाहेबांइतका मोठा नाही अशी सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिली. पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना भारतातून हिसकावून लावण्याच्या मागणीसाठी ९फेब्रुवारीला मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा राज यांनी या अधिवेशनात केली होती.
हेही वाचा :- Dombivali ; लोकवर्गणीतून बालिकेच्या हृदयावर शस्त्रक्रिया
या मोर्चाच्या तयारीसाठी सोमवारी रंगशारदा सभागृहात मनसेचे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत संबोधित करताना राज म्हणाले की मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका तो मान बाळासाहेबांचा आहे, मी त्यांच्या इतका मोठा नाही. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असणाऱ्या झेंड्या बाबतही राज यांनी सूचना दिल्या कोणत्याही स्थितीत या ध्वजाचा अवमान होता कामा नये. ज्या प्रभागात हा झेंडा लावला जाईल तेथील विभाग प्रमुखांवर याची जबाबदारी असेल पक्षीय कार्यक्रमात शक्यतो रेल्वेचे इंजिन असलेले ध्वज वापरावा. ९ फेब्रुवारीला होणाऱ्या मोर्चासाठी तयारीला लागा.
हेही वाचा :- “दहा रुपयांच्या थाळी सोबत वीस रुपयांची बिसलरी पिणारे गरीब माणूस”
जास्तीत जास्त लोक मोर्चात सहभागी होतील यादृष्टीने नियोजन करा अशा सूचना राज ठाकरे यांनी यावेळी दिली. राज ठाकरे या बैठकीतून केवळ दहा मिनिटात बाहेर पडल्याने उलट-सुलट चर्चा रंगली. मात्र राज यांना घशाचा त्रास सुरू झाल्याने ते थोडक्यात बोलून बाहेर पडल्याची माहिती मनसेतील सूत्रांनी दिली. त्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांना पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. आता 9 फेब्रुवारी च्या मोर्चा कडे सर्वांचे लक्ष आहे.