डोंबिवलीत घरफोडी
डोंबिवली दि.०६ – डोंबिवली पूर्वेकडील टिळक रोड गडकरी पथ ,ड्रीम हाउस येथे राहणारे कौशिक डाघा दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. ही संधी साधत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलुप तोडून घरतील 40 हजारांची रोकड चोरून नेली.
हेही वाचा :- कल्याण ; पोलीस स्थानकासमोरच चोरट्यांचा धुमाकूळ
सायंकाळी घरी परतल्या नंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
Please follow and like us: