डोंबिवलीतील बांधकाम व्यवसायिकाला खंडणीची आणि जीवे ठार मारण्याची धमकी..
डोंबिवली दि.१६ – एकेकाळी शांत शहर म्हणून राज्यात नावरूपाला आलेल्या डोंबिवली नगरीला ८० -९० च्या दशकात अंडरवर्ल्डची नजर लागली. मोठ-मोठ्या व्यवसायिकांना खंडणीची धमकी देत शहरात हळूहळू पाय पसरविलेल्या अंडरवर्ल्डला त्यावेळेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सापळा लावून धरपकड सुरु केली होती. मात्र पोलिसांच्या या प्रयत्नाने अंडरवर्ल्ड थंड पडले नाही. त्यानंतर काही काळ या दहशतीपासून आपली सुटका झाली असेव्यावसायिकांना वाटले होते. पोलीस यंत्रणानेची नागरिकांनी पाठ थोपाटली होती.
हेही वाचा :- डोंबिवली ; महिलांची छेड काढणाऱ्या नराधमाला महिलांची बेदम चोप ; live Video
मात्र आता पुन्हा गुन्हेगारी विश्वाने डोके वर काढले.डोंबिवलीतील पोलीस ठाण्यात खंडणीच्या तक्रारीत वाढ होऊ लागली. १२ जानेवारीला बांधकाम व्यवसायिक भगवान भुजंग यांना पाच करोड रुपयांची खंडणी मागत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार टिळकनगर पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. `मै ऑस्टेलियासे रवी पुजारी बोल रहा हु ! दो दिन मे पाच करोड रुपया देनेका नहीतो गोली मरुंगा ! अशी धमकी बांधकाम व्यवसायिक भगवान भुजंग यांच्या मोबाईल फोनवर दिली. त्यानंतर पुन्हा एस.एस.एस वर धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.