डोंबिवलीचे सुपुत्र केप्टन विनायकुमार संचांन यांना डोंबिवलीकराची आदरांजली

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.२४ – डोंबिवलीचे सुपुत्र केप्टन विनय कुमार संचांन 2003 मध्ये कश्मीर मध्ये अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत शाहिद झाले आज त्याचा 16 वा स्मृतिदिन आदरांजली वाहून संपन्न झाला.

डोंबिवली पूर्व येथील घरडा सर्कल येथील कॅप्टन विनयकुमार सचाण यांच्या स्मृतीदिना निमित्त सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयातून वन महाराष्ट्र नेव्हल युनिट एन.सी.सी चे कॅडेट्स मानवंदना व पुष्पचक्र स्मृती स्थळाला अपर्ण करण्यात आली. यावेळी शाळेतील मुलांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला वैशिष्ट म्हणजे येथे एम.आय.-१७ हेलिकॉप्टर, मिराज -२०००, मीग -२१ व राफेल या लढाऊ विमानाची प्रतिकृती ठेवण्यात आली होती. सिद्धार्थ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुनील कांबळे या प्रसंगी उपस्थित होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email