डोंबिवली ; निवडणुकीच्या तोंडावर गावठी कट्टा व काडतुससह दोन तरुण गजाआड

डोंबिवली दि.०२ – कल्याण पूर्वेकडील परिसरात कोलशेवाडी पोलिसांची गस्त सुरु असताना काही जन या परिसरात शस्त्र विकण्यास येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी कमलादेवी शाळा परिसरात नाकाबंदी केली. याच दरम्यान एक भरधाव वेगाने दुचाकी आली. या दुचाकीवर दोन तरुण होते. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी या दोघा तरुणाची झडती घेतली. या तरूणाकडून एक गावठी कट्टा व ३ काडतूस जप्त केले. या दोन्ही तरुणांना कोलशे वाडी पोलिसांनी अटक केली आहे. शेर अली मोहम्मद शेख ,अकबर मुश्तफा अशी दोघाचे नाव असून ते उल्हासनगर शांती नगर येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच हे कट्टे त्यांनी कशासाठी आणले होते. याचा तपास पोलीस करत आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email