डोंबिवली ; पाणी चोर धाबे मालकासह कर्मचार्या विरोधात गुन्हा दाखल
डोंबिवली दि.०३ – मुख्य जलवाहिनीला छिद्रे पडून पाणी चोरी करणाऱ्या धाबा मालकासह कामगाराविरोधात मानपाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंबिवली पूर्वेकडील बदलापूर पाईप लाईन रोड येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची जलवाहिनी आहे. या जलवाहिनीला छिद्रे पडून पाणी चोरी होत असल्याचा तक्रारी महामंडळाला आल्या होत्या.
हेही वाचा :- डोंबिवली ; एल आय सी एजेंट असल्याचा बतावणी करत वृद्ध इसमाचा मोबाईल लंपास
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा विभागाने अश्या पाणी चोरीवर कारवाईचाबडगा उगारला आहे. सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास या रोडवरील एकविरा धाब्यासाठी बेकायदेशीरपने पाईप लाईनला छिद्र पाडून पाणी चोरी सुरु असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी एकविरा धाब्याच्या मालकासह अब्दुल मोहम्मद सादिक खाज्जा मन्सुरी या कर्मचा-या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.