डोंबिवली ; कारमधून पिस्तुल चोरली
डोंबिवली दि.२५ – एका बांधकाम ठेकेदाराच्या गाडीतून परवाना धारक पिस्तुल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे. डोंबिवली पश्चिम महात्मा फुले रोड मिलेनियम पार्क येथील जितेंद्र निवास येथे राहणारे गणेश म्हात्रे हे बांधकाम ठेकेदार आहेत.
हेही वाचा :-
बुधवारी सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपली गाडी चोळेगाव रोड वरील मंगल कलश बिल्डींग समोर उभी केली होती त्याच्या गाडी मध्ये त्यांची परवाना धारक पिस्तुल होती काही वेळाने साडे पाच वाजण्याच्या सुमारास ते पुन्हा गाडी घेण्यासाठी आले तेव्हा त्यांना गाडीतील पिस्टल चोरीला गेल्याचे लक्षात आले त्यांनी या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलीसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु कला आहे.