डोंबिवली ; तरुणवर्गात घटस्फोटाचे प्रमाण वाढत असून यात तरुण विवाहित मुलींचे प्रमाण अधिक…
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.२० – सध्या तरुणवर्गामध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढले असून यामध्ये तरुण विवाहित मुलींचे प्रमाण जास्त आहे. यामुळे कुटुंब संस्था विस्कळीत होत असून लहान मुलांवर परिणाम होत आहे. यासाठी आता विवाहपूर्व समुपदेशानाची गरज आहे असे मत ठाणे कौटुंबिक न्यायालयाच्या समुपदेशक माधवी देसाई यांनी डोंबिवलीत व्यक्त केले. डोंबिवली पत्रकार संघाने ‘कुटुंब संस्थेचे बदलते स्वरुप ‘या विषयावर आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पिढयान पिढया चालत आलेल्या पुरुष प्रधान संस्कृतिला आता तडे जाऊ लागले आहेत. स्त्री-पुरुष समानतेच्या विचारांचे वारे वाहू लागले आहेत. स्त्रियांचे सबलीकरण,आर्थिक स्वावलंबन,यामुळे वैवाहिक नात्यातील पती-पत्नीची भूमिका बदलत आहे. दोघे ही अर्थाजन करत असून घरातील कामाची वाटणीही समान असावी. या स्त्रियांच्या अपेक्षांची पूर्तता पुरुषांकडून तितकीशी होताना दिसत नाही, कुटुंब पातळीवर स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समान दर्जा मिळवण्याच्या धडपडीत अपेक्षा भंगाचे दु;ख पदरी आले की नाते संबंधांना तडा जाताना दिसतो.
हेही वाचा :- आवरे येथे भारतीय शहीदांना भावपूर्ण श्रधांजलि
पत्नीला करियरमध्ये पुढे जाताना कुटुंबातून आधार मिळाला नाही तर त्यातुनही नैराश्य येऊन स्त्रिया वैवाहिक नाते संबंधातून बाहेर पडत असल्याचे त्यानी निदर्शनाला आणले. घटस्फोटाचे वाढते प्रमाण हे कुटुंब संस्थेला अस्थिर करण्यास कारणीभूत असून अस्थिर कुटुंबातून मुलांचे संगोपन नीट होत नाही अशा कुटुंबांमध्ये मुलांच्या वाढीला आवश्यक असणारे सुरक्षित वातावरण मिळू शकत नाही आई वडिलांच्या भांडणात मुलांच्यात असुरक्षितेची भावना निर्माण होते.यामुळे मुले बालपण विसरतात व त्यांना लवकर प्रौढत्व येते असेही त्यानी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले यामुळे विवाह करण्याचा निर्णय पूर्ण विचारांती घेणं आवश्यक असून आपण एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करु शकणार आहे का,आपले मन,विचार,रहाणीमान जुळणार आहे. अशा सर्व गोष्टींचा विचार विवाहपूर्व समुपदेशनाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.