डोंबिवली ; क्षुल्लक कारणावरून डोक्यात दगड घालून मारहाण
डोंबिवली दि.२२ – कल्याण पूर्व विठ्ठलवाडी रायगड कॉलनीमध्ये राहणारे भूषण पांचाळ हे बुधवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मित्र योगेश सोबत बुर्जीपाव खाण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी असणाऱ्या सिद्धेश,अक्षय ,सेन्डली ,व त्याच्या मित्राने योगेश याच्यासोबत हुज्जत घातली व मारहाण करण्यास सुरुवात केली.
हेही वाचा :- डोंबिवली ; रिक्षा चालकाच्या डोक्यात बाटली फोडली
यावेळी भूषण हे भांडण सोडवण्यासाठी गेले असताना सिद्धेश ,अक्षय ,सेन्डली व त्याच्या मित्राने त्यांना देखील मारहाण करत भूषण यांच्या डोक्यात दगड घातला व चाकूने हल्ला केला. या प्रकरणी कोलशेवादी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात करण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी सिद्धेश ,अक्षय ,सेन्डली ,व त्याच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
हेही वाचा :- महिलेसह पुतनीला मारहाण डोंबिवलीतील घटना