डोंबिवली ; कंपनीत चोरी करण्याच्या तयारीत असणारे सहा जन गजाआड मानपाडा पोलिसाची कारवाई
डोंबिवली दि.१३ – डोंबिवली भोपर नांदिवली पाडा परिसारातील एका कंपनीत चोरी करण्याच्या प्रयत्नात असणा-या सहा चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. विजय चौहान ,गुरुप्रसाद जैस्वाल ,सुनील कुमार रॉय ,सोमेन उर्फ सोनू रॉय ,राजकुमार गुप्ता ,दाडी भाई असे या सहा अटक आरोपींची नावे आहेत. डोंबिवली पूर्वेकडील भोपर नांदिवली पाडा या ठिकणी असलेल्या धनलक्ष्मी प्रोसेसिंग प्रिंटींग मिल्स या कंपनी लगत असलेले हे सहा ही जन कापडाचे गठल्या लुटण्याच्या प्रयत्नात होते.
हेही वाचा :- डोंबिवली ; कर्जाला कंटाळून एका तरुणाची आत्महत्या
मात्र गस्तीवर असणाऱ्या मानपाडा पोलिसांनी त्यांना पाहून संशय आल्याने त्यांनी या सहा जणांना हटकले. त्यांची झडती घेतली असताना त्याच्यावर शस्त्र आढळून आल्याने त्यांना अटक केली. पोलीस चौकशी दरम्यान त्यांनी चोरोच्या उद्देशाने आल्याची कबुली दिली. या प्रकरणी या सहा जणांना विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.