डोंबिवली पत्रकार संघाची २०१९-२० ची कार्यकारणी जाहीर…

डोंबिवली दि.१६ – डोंबिवली पत्रकार संघाची सोमवारी वार्षिक बैठक पार पडली. या बैठकीत २०१९-२० ची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. नवीन कार्यकारणीत ज्येष्ठ पत्रकार अध्यक्षपदी विकास काटदरे ( सामना ),कार्याध्यक्षपदी राजलक्ष्मी पुजारे-जोशी( महाराष्ट्र टाईम्स), सचिवपदी श्रीराम कांदू ( वृत्तमानस ) आणि खजिनदारपदी प्रवीण गोरे ( लव-अंकुश साप्ताहिक –संपादक ) याची बिनविरोध निवडकरण्यात आली. यावेळी मावळते अध्क्षा पत्रकार जान्हवी मोर्ये यांनी अध्यक्षपदाची धुरा नवनियुक्त अध्यक्ष जेष्ठ पत्रकार काटदरे यांच्या हाती सोपविली. ज्येष्ठ पत्रकार विकास काटदरे यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर या वर्षात अनेक सामाजिक संस्थाच्या कामांची माहती मिळावी तसेच विविध उपक्रम हाती घेतले जातील असे सांगितले.

हेही वाचा :- कल्याण-डोंबिवलीत फेरीवाले मोकाट

डोंबिवली पत्रकार संघाचे सदस्य ज्येष्ठ पत्रकार तथा सिनेकलाकार अजय निकते यांनी डोंबिवली पत्रकार संघाचे कार्य खूप मोठे असल्याचे सांगत माझ्या या यशात या संघाचा मोठा हातभार असल्याचे सांगितले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र थोरावडे यांनी डोंबिवली पत्रकार संघाच्या कामाबाबत थोडक्यात माहिती दिली. राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याबरोबर चर्चा, डोंबिवलीतील सांडपाणी प्रक्रिया केंद्राची पाहणी, बारवी धरण प्रकल्प पुर्नवसन पाहणी,`पावसाळ्यातील आजार व त्वचेची काळजी`या विषयावर डॉ. स्वाती गुरव यांच्याशी संवाद,`वाढत्या आत्महत्या` हा विषय घेऊन डॉ. मानसोपचार डॉ. पाध्ये यांच्याशी चर्चा,प्लाझा ब्लड बँकच्या रोप्यमहोत्सवी दिनानिमित्त रक्तदानबाबत जागरूकतेची माहिती,जव्हाड-मोखाडा भागातील आदिवासी पाड्याच्या आजच्या स्थितीबाबत पाहणी असे आठ वार्तालाप आणि पाहणी दौरे पत्रकार जान्हवी मोर्ये अध्यक्षपदाच्या काळात पार पडले.यानंतर संघाच्या सर्व सदस्यांनी नवीन कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच देऊन अभिनंदन केले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email