पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त कॉंग्रेसच्या वतीने डोंबिवलीत चित्रकला स्पर्धा
डोंबिवली दि.१५ – आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त व काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवली पश्चिमेकडील लोकप्रिय शाळेच्या पटांगणात चित्रकला स्पर्धेचे पार पडली. स्पर्धेचे आयोजन डोंबिवली विधानसभा क्षेत्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष पमेश एकनाथ म्हात्रे ह्यांनी केले होते. या स्पर्धेत शाळा महाविद्यालय मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेत पहिला, दूसरा आणि तिसरा क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.
हेही वाचा :- उद्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले कल्याणात
बालगट– इयत्ता १ली ते ४ थी, किशोर गट इयत्ता ५ वी ते १० वी खुला गट सर्व वयोगटांसाठी खुली असे स्पर्धेचे गट होते. चित्रकला स्पर्धेसाठी विविधतेतून एकता आणि भारताचा शोध असे दोन विषय देण्यात आले होते. या स्पर्धेत ब्लॉक अध्यक्ष एकनाथ म्हात्रे, महिला उपाध्यक्षा वर्षा जगताप, जिल्हाध्यक्ष युवक राहुल काटकर, शिला भोसले, दिप्ती दोषी, बेबी परब, सुभाष म्हात्रे, किशोर काळण, गौरव माळी, स्वप्निल छत्तीसकर, निवृत्ती जोशी, अभय तावडे, विद्याधर दळवी, जय महाजन, राजेश म्हात्रे, भावेश म्हात्रे, अश्वजित काठे आदि पदाधिकारी उपस्थित होते.या स्पर्धेत पूजा भोईर ( इ.९ वी ), स्नेहा पाटील ( इ.१० वी), चैतन्य म्हात्रे (इ.८ वी),निष्ठा सरपोळे (इ.७ वी),समील (इ.६ वी) आणि ओम भोईर (इ. ६ वी) या विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. यावेळी लोकप्रिय विद्यालय मुख्याध्यापिका धांडे यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले.