डोंबिवली ; बिल नाही तर काम नाही कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराचे काम बंद आंदोलन…

डोंबिवली दि.२३ – नियमित पणे बिल न मिळाल्याने अखेर पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी वापरात असणारी वाहने ठेकेदाराने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील कचरा उचलण्याकामी जयमल्हार ट्रान्सपोर्ट कंपनीला घनकचरा उचलण्याचा ठेका देण्यात आला. प्रभाग क्र. १, ४, ५, ७, ९, १० या प्रभागात कचरा उचलण्यासाठी ९ जेसीपी व ३५ डंपर यासाठी वापरात आहेत. मात्र वर्षभरापासून ठेकेदाराला बिले अदा न करण्यात आल्याने त्या ठेकेदाराने जेसीपी, डंपर महापालिकेच्या सेवेत देण्याचे बंद केले आहे. त्यामुळे कल्याणच्या अ, ज, ड, ह, आय, व एफ या प्रभागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले असल्याने त्या प्रभागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

प्रलंबित बिलांबाबत ठेकेदाराणे सातत्याने पाठपुरावा करत प्रयत्न केले थकीत बिलांबाबत आयुक्तांना भेटून अडचणी मांडताना बिले न मिळाल्यास गाड्यांसाठी इंधन व देखभाल दुरुस्ती करणे अडचणीचे ठरत असल्याचे निदर्शनास आणून दिले. याबाबत आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना बिले देण्यास सांगूनही बिले मंजूर करीत नाहीत. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या त्या ठेकेदाराने २० तारखेपूर्वी काही बिले देण्याची मागणी करताना २१ तारखेपासून हि सेवा बंद करण्याचा इशारावजा लेखी नोटीसही दिली होती. त्याबाबत उपायुक्तांनी दखल न घेतल्याने २१ तारखेपासून हि सेवा देण्याचे ठेकेदाराने बंद केले आहे. त्यामुळे प्रभागातील कचरा न उचलला गेल्याने कचऱ्याचे ढीग साचू लागले असून यापुढेही कचरा उचलणार नाही असा इशारा ठेकेदाराने दिला आहे. आयुक्तांकडून बिले मंजूर झाल्यानंतर अकाऊंट विभागाकडे बिले जातात. तेथे सीरियली बिले दिली जाण्याची पद्धती अंगिकारली जात असल्याने हे पेमेंट आणखी उशिरा मिळत असल्याचीही खंत ठेकेदाराने व्यक्त केली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email