डोंबिवलीत गुणिजनांना अभिवादन
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.०४ – ज्यांनी अनेक दशके शहराच्या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक जीवनात मोलाची भर घातली पण जे प्रकाशझोतात आले नाहीत. त्यांच्या कार्याची ओळख व्हावी व तरुण पिढी समोर एक चांगला आदर्श ठेवावा. या उद्देशाने या ४७ संस्थानी नागरी अभिवादन समारंभात त्या चार जेष्ठ गुणीजनांना अभिवादन केले. टिळकनगर शाळेच्या प्रांगणात डोंबिवलीतील ४७ संस्थानी एकत्र येवून सहा गुणवंतांचा सत्कार केला या सत्कारांचे हे सहावे वर्ष होते.
हेही वाचा :- एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत रु. 4500 कोटींची वाढ
द भा धामणस्कर, उदयचंद्र मोडक, टी एन मुथ्थुकृष्णन, जयश्री कानिटकर याचबरोबर युवा नरेंद्र गोडसे आणि पूर्वा मॅथ्यू यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. धनश्री लेले यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. दर्शना सामंत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, महापालिका स्थायी समिती अध्यक्ष दीपेश म्हात्रे, तसेच डोंबिवलीतील अनेक मान्यवर सोहळ्याला उपस्थित होते.